vinay kore.jpg sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vinay Kore : करवीरमध्ये काँग्रेस विरुद्ध जनसुराज्य लढत होणार? विनय कोरे म्हणाले, मला फक्त 60 दिवस...

Vinay Kore News : विनय कोरे म्हणतात, पंधरा वर्षांपूर्वी मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने पन्हाळा, गगनबावड्यातील कार्यकर्ते काहीसे पोरके झाले होते. पण...

Akshay Sabale

'करवीर मधून आतापर्यंत झालेल्या आमदारांनी विकासात्मक काय केले, असा सवाल करत आगामी 60 दिवस माझ्यासाठी द्या, 'जनसुराज्य' पक्षाचा आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, आमदार विनय कोरे यांनी केला.

आसगाव (ता. पन्हाळा) येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील 'जनसुराज्य 'पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

विनय कोरे ( Vinay Kore ) म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत 'जनसुराज्य' पक्षाला सन्मानजनक जागा देण्याच्या अटीवरच महायुतीला पाठिंबा दिला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काही काळ काठावर असणारी मंडळी आता उमेदवारीचा दावा करत आहेत, पण काहीही झाले तरी 'करवीर'चा आमदार हा 'जनसुराज्य' पक्षाचाच होईल."

"पंधरा वर्षांपूर्वी मतदारसंघ पुनर्रचना झाल्याने पन्हाळा, गगनबावड्यातील कार्यकर्ते काहीसे पोरके झाले होते. पण, मी येथील आमदार नसलो तरी जनतेच्या भावनेशी कधी खेळलो नसल्याने आजही त्यांचा माट्यावरील विश्वास तसूभरही कमी झालेला नाही. विधानसभेला सन्मानजनक जागा देण्याच्या अटीवरच महायुतीला पाठिंबा दिला आहे," असं विनय कोरे यांनी सांगितलं.

"लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एक खासदार करण्यात 'जनसुराज्य' पक्षाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे 'करवीर', 'हातकणंगले', 'शाहूवाडी' व 'चंदगड' या जागा आम्हाला द्याव्यात," अशी मागणी विनय कोरे यांनी केली आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत करवीर मतदारसंघातून दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. यातच विनय कोरे यांनी करवीर मतदारसंघावर दावा केला आहे. 'जनसुराज्य' पक्षाकडून संताजी घोरपडे संभाव्य उमेदवार समजले जातात. घोरपडे यांच्याकडून पाच वर्षापासून 'मतपेरणी' सुरू आहे. करवीरची जागा विनय कोरे यांच्या पक्षाला सुटल्यास काँग्रेस विरुद्ध 'जनसुराज्य' असा सामना होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT