Vishalgad Update Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishalgad Update: इम्तियाज जलीलांना कोल्हापुरी पायताण दाखवू, एमआयएमच्या इशाऱ्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Sambhajiraje for leading protest to Vishalgad: इम्तियाज जलील यांनी कोल्हापूरात येऊ नये. कोल्हापुरात आले तर त्यांचे स्वागत कोल्हापूर पायतानाने करू, असा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे.

Mangesh Mahale

Kolhaour: विशाळगडावरील (Vishalgad) येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापुरात येण्याची घोषणा केली आहे. 19 जुलै रोजी इम्तियाज जलील कोल्हापुरात येणार असल्याने आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.एमआयएमला कोल्हापुरात प्रवेश देऊ नये, अन्यथा कोल्हापूर बंदची हाक देण्याची घोषणा सकल हिंदू समाजाने केली आहे.

'एमआयएम' च्या मोर्चाला सकल हिंदू समाजाने विरोध केला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी कोल्हापूरात येऊ नये. कोल्हापुरात आले तर त्यांचे स्वागत कोल्हापूर पायतानाने करू, असा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे. प्रशासनाने एमआयएमच्या मोर्चाला परवानगी देऊ नये अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

विशाळगड गजापूर्व मुस्लिमवाडी येथे 14 जुलै रोजी समाजकंटकांनी हिंसाचार जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. हे पोलिस व प्रशासनाचे अपयश आहे. भारताच्या धर्मापेक्षा लोकशाही विचारांना गालबोट यामुळे लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची ही भूमी आहे.

या भूमीवर या पद्धतीने धार्मिक द्वेष पसरवत अशांतता माजवणाऱ्यांचा उन्माद खपवून घेतला जाणार नाही. कोल्हापुरात शाहू महाराजांचा विचार हा जनतेने केंद्रस्थानी मानला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या विचाराच्या जनतेने या विशाळगडच्या घटनेचा निषेध करत शांततेचे आवाहन करणे महत्त्वाचे आहे.

इंडिया आघाडी व कोल्हापुरातील सर्व शाहूप्रेमी जनतेच्या वतीने 18 जुलै रोजी दुपारी चार वाजता शाहू समाधी स्थळ ते शिवाजी पुतळा अशी शिवशाही सद्भावना रॅली काढण्याचे ठरवले आहे. यामध्ये कोल्हापुरातील सर्व नागरिकांनी जात धर्म पंथ संघटना गट तट विसरून शाहू महाराजांच्या विचारासाठी एकत्र येऊन रॅली सहभागी होण्याचे आवाहन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT