Gramsabha
Gramsabha sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बिअर बारच्या परवानगीवरून धावरवाडी ग्रामसभेत तुंबळ हाणामारी; 16 जणांवर गुन्हा

संतोष चव्हाण

उंब्रज : बिअर बारला परवानगी दिल्याच्या कारणावरून धावरवाडी येथील ग्रामसभेतच तूंबळ हाणामारी झाली. त्यात शासकीय मालमत्तेचे नुकसानीसह एकमेकांना शिवीगाळ दमदाटी करण्यात आली. सकाळी अकराच्या सुमारास घटना घडली. गावात त्यामुळे तणावाचे वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी उंब्रज पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. त्यात तीन फिर्यादी आहेत. त्यानुसार 16 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून दारू दुकानाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

उंब्रज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शेळके यांनी तक्रार दिली अून त्यात फिर्यादीसह नानासाहेब शेळके, संजय चंदूगडे, महेश चंदूगडे, विलास शेळके, कृष्णात चंदुगडे, राहुल कदम, निलेश शेळके, संभाजी शेळके यांनी सरपंच महेश सुतार यांना ऐनवेळेच्या विषयावेळी प्रश्न विचारला. त्यात मागील ठरावात बिअर बारला परवानगी का दिली, असे विचारत त्यांनी सरपंच महेश सुतार, श्रीकांत चव्हाण, प्रज्वल चव्हाण, शंकर चंदूगडे, सागर चव्हाण, दादासाहेब चंदूगडे यांच्याशी वाद घालता, शिवीगाळ केली. यावेळी सागर चव्हाणला लाकडी बॅटने मारहाण करून जखमी केले. त्यानुसार सहा जणांवर गुन्हा दाखल आहे.

सरपंच महेश संभाजी सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीत ग्रामसभा चालू असताना गावातील संजय चंदुगडे, सचिन शेळके, महेश चंदूगडे, विलास शेळके, कृष्णात चंदुगडे, निलेश शेळके, राहुल कदम, नानासाहेब शेळके यांनी मागील ग्रामसभेत तुम्ही निखिल साळुंखे यांना बिअर बारची परवानगी कशी काय दिली असे म्हणून त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. गावातील संजय चंदुगडे, श्रीकांत चव्हाण, प्रज्वल चव्हाण व सागर चव्हाण यांना सचिन शेळकेने मारहाण केली..

ग्रामसेवक विजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत ग्रामसभा असताना सचिन शेळकेने ऐनवेळेच्या विषयांमध्ये सरपंच महेश सुतार यांना तुम्ही मागील ग्रामसभेच्या ठरवात बिअर बारला परवानगी कशी काय दिली असे विचारले. त्यावरून सरपंच सुतार आणि सचिन शेळकेसह ग्रामस्थात बाचाबाची झाली. त्यानंतर थेट मारामारी सुरू झाली.

महेश चंदूगडे, निलेश शेळके यांनी विनापरवाना मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग केले. त्यावेळी ग्रामसवेक शिंदे यांनी नियमानुसार ग्रामसभा चालू आहे, तुम्ही शूटिंग करू नका असे सांगितले. त्यावेळी दोघांनी ग्रामसेवक शिंदे व सरपंच सुतार यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ग्रामपंचायतीचे इंटरनेट सेवेचे साहित्याची मोडतोड केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT