AI Photo Viral call allegedly causes MLA defamation goldsmith assaulted by workers sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Viral Call Controversy : व्हायरल कॉलमुळे आमदाराची बदनामी, सराफ व्यवसायिकावर प्राणघातक हल्ला, 25 ते 30 जणांच्या जमावाकडून बेदम मारहाण

Kolhapur MLA Defamation : 25 ते 30 जणांच्या जमावाने गुजरी परिसरात दहशत पसरवत सराफ व्यवसायिकाला मारहाण केली. या मारहाणीमागे आमदाराच्या बदनामीचे कारण दिले जात आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : सोने देवाणघेवाणा झालेला व्यवहार सोशल मीडियावर आणल्याने आणि सत्तेतील आमदारांचा यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केल्याचा राग मनात धरून जमावाकडून सराफ व्यवसायिकाला बेदम मारहाण करण्यात आली.

25 ते 30 जणांच्या जमावाने गुजरी परिसरात दहशत पसरवली. शिवाय हे प्रकरण एका पक्षातील माजी जिल्हा प्रमुखांकडे नेल्याप्रकरणी गुजरीतील महादेव गल्लीतील सराफ व्यावसायिक प्रदीप शांतीलाल राठोड उर्फ पप्पू (वय ३०) यांना मारहाण केली. या मारहाणीत राठोड हे जखमी झाले असून सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली असून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात 12 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, राठोड हे सराफ व्यवसायिक आहेत. त्यांचे गुजरीत सरफाचे दुकान आहे. त्यामुळे सोने देवाणघेवाण संदर्भात त्यांचा काही जणांसोबत व्यवहार झाला होता. मुख्यतः एमसीएक्सवरील व्यवहारात त्यांना जास्त रस होता. दरम्यान, या व्यवहारातून तोटा झाल्याचे लक्षात येतात संबंधित व्यक्तीने सत्ताधारी आमदाराचा कार्यकर्ता असलेला कपिल केसरकर यांच्याकडे मध्यस्थीसाठी गेला. त्यातूनच हा वाद सत्ताधारी आमदारांपर्यंत गेला.

दरम्यान संबंधित आमदारांनी राठोड यांना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली. राठोड यांना लोकप्रतिनिधींचा फोन आल्यानंतर त्यांनी एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हाप्रमुखाकडे धाव घेतली. दरम्यान त्या माजी जिल्हाप्रमुखांनी माध्यमात ही बातमी पसरवली शिवाय सोशल मीडियात संबंधित आमदारांची व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले.

त्यामुळे कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधींची बदनामी झाल्याच्या रागातून जवळपास 20 ते 25 जणांच्या जमावाने थेट गुजरी गाठत सराफ व्यावसायिक राठोड यांना दुकानातून बाहेर ओढून त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रोड काठीने मारहाण झाल्याने

राठोड या हल्ल्यात जखमी झाले आहेत. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू असल्याने गुजरी परिसरात दहशत निर्माण झाली होती. जखमी राठोड यांना सीपीआर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

गुन्हा दाखल

राठोड हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कपिल केसरकर, बंडा लोंढे, चिंचणेकर, दिगंबर फराकटे, उदय भोसले यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT