vishal patil vishwajeet kadam jayant patil
vishal patil vishwajeet kadam jayant patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Vishal Patil Vs Jayant Patil : जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात जाऊन विशाल पाटील अन् विश्वजीत कदमांनी दिलं थेट आव्हान

Akshay Sabale

सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील, माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात येत होता. पण, लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या विजयानंतर हा कलगीतुरा थांबण्याची चिन्हे दिसत नाही.

विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या 'टार्गेट'वर जयंत पाटील ( Jayant Patil ) आले आहेत. याला लोकसभा निवडणुकीत तिकीट कापल्याची पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, याला पिढ्यानं-पिढ्यांची राजकीय किनार आहे.

यातच इस्लामपूर मतदारसंघातल्या कसबे-डिग्रज येथे आयोजित केलेल्या सक्तार समारंभातून विशाल पाटील ( Vishal Patil ) आणि विश्वजीत कदम यांनी जयंत पाटील यांना इशारा दिला आहे. "इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर आपलं विशेष लक्ष राहील. या मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील," असं म्हणत विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन ललकारलं आहे.

"आम्ही कसबे-डिग्रजमधील जनतेच्या पाठिशी उभे आहोत. कसबे-डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं, त्यापेक्षा 10 पटीनं येणाऱ्या काळात लक्ष देऊ. त्यामुळे पत्रकारांनी काय लिहायचं ते लिहा. आम्हाला कसलीही काळजी नाही. सांगलीची जनता आमच्या पाठिशी आहे. सांगलीत मोठं परिवर्तन पाहायला मिळणार आहे," असं विश्वजीत कदमांनी ( vishwajeet kadam )म्हटलं.

"सांगलीत सत्कार व्हायच्या आधी इस्लामपूर मतदारसंघात आलो आहे. यातून ओळखलं पाहिजे की पुढची आपली दिशा काय असेल. आमच्याकडून कुचकं राजकारण होत नाही. आम्ही सरळ निर्णय घेतो. मनात आहे, तेच तोंडावर असते. ते तुम्हाला पुढील काळात पाहायला मिळेल. याठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे. कुणाच्यातरी दबावाखाली राहण्याची दिवस गेले आहेत. वसंतदादा आणि पतंगराव कदम यांचं घर एकत्र झालं आहे. ही सगळी ताकद जिल्ह्याला चांगल्या दिशेनं नेणार आहे," असं विशाल पाटलांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT