Vishwajeet Kadam
Vishwajeet Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विश्वजित कदमांच्या बालेकिल्ल्यात भाजप सुरुंग लावू शकला, कारण...

सरकारनामा ब्युरो

सांगली : नुकत्याच लागलेल्या नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात अनेक दिग्गजांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले. यात राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांचाही समावेश होता. कदम यांचे गाव असलेल्या कडेगाव नगरपंचायतीमध्ये (Maharashtra Nagar panchayat Election) भाजपने सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे कदम यांना त्यांच्याच घरी पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे. मात्र आता त्यांनीच या पराभवाचे कारण सांगितले आहे.

सांगलीत शनिवारी नगरपंचायतीत निवडून आलेल्या काँग्रेस (congress) नगरसेवकांचा सत्कार व मुख्य नोंदणीकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील उपस्थित होते. मंत्री कदम म्हणाले, काही लोकांवर जादा विसंबून राहिल्याने कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. माझ्याकडूनही काही चुका झाल्या.

तसेच यापुढे सांगली जिल्ह्यात काँग्रेस एकसंघपणे बांधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आत्मपरीक्षण केले जाईल. जिल्ह्यातील काँग्रेस एकसंघपणे बांधण्यासाठी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आत्मपरीक्षण केले जाईल. पक्षामध्ये जे काही अंतर्गत वाद असतील ते बंद खोलीत एकत्र बसवून मिटविले जातील. यापुढे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेऊन काम करण्यावर भर राहील असेही मंत्री कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कडेगावचा निकाल काय?

कडेगाव नगरपंचायतीमध्ये भाजपने सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पहिल्यांदाच स्वतंत्र पॅनेल टाकल्याने काँग्रेसचा (Congress) पराभव झाल्याची चर्चा आहे. भाजपला (BJP) १० तर काँग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे तर भाजप व राष्ट्रवादीपुढे सत्ता काबीज करण्याचे आव्हान होते. यामध्ये भाजपने बाजी मारली असून काँग्रेसला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा धुव्वा उडाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT