Vishwajeet Kadam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Video Vishwajeet Kadam : लोकसभेला खडे टाकणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला केलं; विश्वजीत कदमांचा रोख कुणाकडे?

Vishwajeet Kadam Sangli Congress Politics : लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी उमेदवारीसाठी विश्वजित कदम यांनी जंग-जंग पछाडले होते. आता विशाल पाटील निवडून आल्यानंतर उमेदवारी कापण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना कदम यांनी इशारा दिला आहे.

Akshay Sabale

Sangli News : सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यापासून विजय मिळेपर्यंत मला आणि विशाल पाटलांना ( Vishal Patil ) जो त्रास सोसावा लागला, तो आम्हालाच माहिती. पण, त्यावर चोख उत्तर लवकरच देण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी दिला आहे.

ज्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे काम केलं, त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं, असंही विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे. त्यांचा रोख नेमका कोणावर आहे? हे जरी कदम यांनी स्पष्ट केलं नाही. पण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्यावर हा रोख असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

सांगलीत मदनभाऊ पाटील युवा मंचाच्यावतीनं आयोजित नूतन खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार समारंभात विश्वजीत कदम बोलत होते.

विश्वजित कदम ( Vishwajeet Kadam ) म्हणाले, "सांगलीतील काँग्रेसनं एकत्र करत आम्ही सर्वांची मूठ बांधली. आमच्यातील हेवेदावे विसरून आम्ही एकदिलानं काम करण्याचा निर्णय घेतला. सगळी कटुता बाजूला ठेवत जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची सर्व काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवली."

"आमची झालेली ही एकजूट आणि आम्ही बांधलेली मूठ काहीजणांनी बघवली नाही. काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी-ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले. त्यांना त्यांची जागा या लोकसभेत दाखवून दिली आहे. पुन्हा ते आपल्यात खडे टाकण्याचे काम करणार नाहीत. मात्र, आपली आणि कार्यकर्त्यांची एकजूट कायम राहायला हवी," असं आवाहन विश्वजीत कदम यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT