Vishwas Patil amid escalating political tensions after a viral call linked to Mahadeorao Mahadik sparks debate ahead of Gokul Milk Union and Zilla Parishad elections in Maharashtra. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : महादेवराव महाडिकांचा स्कोअर सेटल! आता पुन्हा विश्वास पाटलांची बारी; व्हायरल कॉल रेकॉर्डिंगनंतर 'गोकुळमध्ये' काटा काढणार?

Mahadeorao Mahadik: विश्वास पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातील व्हायरल कॉल प्रकरणामुळे महायुतीत तणाव वाढला असून गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Rahul Gadkar

Gokul Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांना पाडण्याची फिल्डिंग थेट ज्येष्ठ नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीच लावल्याचे समोर आले आहे. यासंबंधीत एक कॉल रेकॉर्डिंग निकाल लागताच व्हायरल होतं आहे. पण या रेकॉर्डिंगचे राजकीय परिणाम आता 2 महिन्यात होऊ घातलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दिसण्याची दाट शक्यता आहे.

जिल्हा परिषदेत करवीरमधील पाडळी खुर्द गटातून विश्वास पाटील यांचा मुलगा सचिन पाटील शिवसेनेकडून रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहुल पाटील यांचे कार्यकर्ते राजू सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. याच गटात सचिन पाटील यांच्या 'उलट मतदान करायचं', असा आदेश महादेवराव महाडिक यांनी दिला असल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे.

मागील वेळी गोकुळच्या निवडणुकीत महाडिक गटाची सत्ता खालसा करण्यामध्ये माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचा मोठा सहभाग होता. गोकुळमध्ये बदलाची भूमिका घेत मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यासोबत त्यांनी महाडिक यांना सत्तेबाहेर केले. ही केवळ संस्थात्मक बदलाची घटना नव्हती, तर सहकार राजकारणातील एक मोठा टर्निग पॉईट होता. महाडिक गटाची प्रतिष्ठा आणि अस्तित्व मानले जाणाऱ्या गोकुळ दूध संघावरच घाला घातल्याने विश्वास पाटील यांच्याबाबत प्रचंड रोष महाडिक गटात आजही आहे.

अशात विश्वास पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरले. याच संधीचा फायदा घेत राष्ट्रवादीची उमदेवारी घेतलेल्या राजू सूर्यवंशी यांना मतदान करण्याचे आवाहन करणारे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले. निकालात सचिन पाटील यांचा पराभवही झाला. पण आता पुढील दोन महिन्यात गोकुळ दूध संघाची निवडणूक होऊ घातली आहे. त्यात विश्वास पाटील यांच्याकडे इतरांपेक्षा सर्वाधिक ठरावधारक असल्याने त्यांनी भूमिका महत्वाची असणार आहे.

दुसऱ्या बाजूला सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून सर्व नेते एकत्र लढण्याची चर्चा सुरू आहे. विश्वास पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर विश्वास पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते देखील आता महायुतीचे घटक बनले आहेत. पण सहकार आणि राजकारण यात बरंच अंतर आहे. त्यामुळे भविष्यात त्यांची भूमिका काय असणार गोकुळची निवडणूक जाहीर झाल्यानंतरच समजणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT