Vivek Kolhe News Updates, Vivek Kolhe Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विवेक कोल्हे म्हणाले, प्रशासनाला हाताशी धरून सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे...

विवेक कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांच्यावर टीका केली.

मनोज जोशी

कोपरगाव ( जि. अहमदनगर ) - कोपरगाव तालुक्यातील वीज, पाटपाणी व इतर प्रश्‍नांवर आवाज उठविण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे ( Snehlata Kolhe ) व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली काल (सोमवारी) जनआक्रोश आंदोलन तहसील मैदानावर झाले. विवेक कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale ) यांच्यावर टीका केली. ( Vivek Kolhe said, the administration is holding hands and harassing the common people ... )

(कै.) शंकररावजी कोल्हे यांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत. आमचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न केला, तर जशास तसे उत्तर देऊ. समस्या सुटल्या नाहीत, तर नागरिकांना घेऊन मुंबई येथे आझाद मैदानावर धडकू, असा इशारा यावेळी कोल्हे यांनी प्रशासनाला दिला. भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, बाळासाहेब वक्ते, जितेंद्र रणशूर, केशव भवर, मच्छिंद्र टेके, विक्रम पाचोरे आदींनी समस्यांचा पाढा वाचला. (Vivek Kolhe News Updates)

विवेक कोल्हे म्हणाले, प्रशासनाला हाताशी धरून सर्वसामान्यांना त्रास देण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी करीत आहेत. त्यांना तालुक्यातील वीज, पाटपाणी, एमआयडीसी, रस्ते, रोहित्रे यांसह इतर समस्या दिसत नाहीत का? लोकशाही पायदळी तुडवणार असाल, तर आम्हालाही वेगळा पवित्रा घ्यावा लागेल.

कोल्हे पुढे म्हणाले, की आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते. सहकार मोडण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. माजी आमदार कोल्हे यांच्या कारकिर्दीतील कामांचे उद्‍घाटन करून ते स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. प्रशासन दडपणाखाली काम करताना दिसते. आम्ही प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, की मतदारांनी नाकारलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये खुर्ची वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. फसवाफसवीचे राजकारण सुरू आहे. एक हजार कोटींचा निधी आणल्याच्या भूलथापा मारल्या जातात. मात्र, काकडी ग्रामपंचायतीचे करापोटी थकबाकी असलेले पाच कोटी सरकार जाणूनबुजून देत नाही. शहरी नेतृत्व असलेल्या सरकारला ग्रामीण भागातील समस्यांशी काही घेणे-देणे नाही. गोदावरी कालव्यावर बिगर सिंचन आरक्षण वाढते आहे. निळवंडे पाणी योजनेत खोडा घातला गेला, असे सांगत कोल्हे यांनी तालुक्यातील समस्यांचा पाढाच वाचला.

सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींच्या जाहिरातीच दिसतात. आम्ही जमिनीवर राहून काम करणारे आहोत. सध्या इमेज बिल्डिंगच्या टीम राजकारणात उभ्या राहिल्या आहेत. फोटोग्राफर सांगेल तसा अॅक्शनचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र, त्याची रिअॅक्शन आल्यावाचून राहणार नाही.

- स्नेहलता कोल्हे, प्रदेश सचिव, भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT