ST Strike sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पगारवाढीमुळे एसटीच्या संपात उभी फूट; आजपासून नवीन वाढ लागू!

पगार वाढीमुळे संपात ST Strike सहभागी होणाऱ्या कर्मचारी संप सोडून कर्तव्यावर हजर होत आहे. सोमवारी Monday राज्यभरात In State १८ हजार ८८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. ७३ हजार ३७८ कर्मचारी अजूनही प्रत्यक्षात संपात सहभागी आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एसटी महामंडळाने आजपासून नवीन वेतन वाढीनुसार वेतन देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात कर्मचारी कामावर हजर होऊ लागले असल्याचा विश्वास एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एसटी महामंडळाच्या बंपर पगारवाढीमुळे संपात उभी फूट पडली असून कामावर येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. मात्र, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून मोठी वेतनवाढीचा आणि इतर सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आजपासून एसटी महामंडळातील जे कर्मचारी संप काळात नियमित कामांवर हजर राहिले आहेत. त्याच कर्मचार्‍यांना नवीन वेतन श्रेणीनुसार वेतन अदा करण्यास सुरवात केली आहे. एसटी महामंडळाचा या बंपर पगारवाढीमुळे आता एसटी संपात उभी फूट पडली असून कामावर येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

पगार वाढीमुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचारी संप सोडून कर्तव्यावर हजर होत आहे. सोमवारी राज्यभरात १८ हजार ८८८ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. ७३ हजार ३७८ कर्मचारी अजूनही प्रत्यक्षात संपात सहभागी आहेत. मात्र, आता एसटी महामंडळाने आजपासून नवीन वेतन वाढीनुसार वेतन देण्यास सुरु केले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर हजर होणार असल्याचा विश्वास एसटी महामंडळाचा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अशी आहे नवीन वेतनवाढ...

नव्या वेतन वाढीनुसार नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात सात हजार २०० रुपये वाढ होतील. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी चार हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात पाच हजार ७६० रुपये वाढ होईल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची २० वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. त्यांच्या मूळ वेतनात सरासरी दोन हजार ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ३० वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे. त्यांच्या मूळ वेतनात सरासरी दोन हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह तीन हजार ६०० रुपयांची वाढ मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT