Satara Loksabha News : सातारा लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकत अल्प असल्याचे नुकत्याच झालेल्या निकालाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. वाई मतदारसंघात आमदार शशिकांत शिंदेंना मिळालेले मताधिक्य लक्षात घेता सर्वांची मानसिकता शरद पवारांच्या पक्षासोबतच राहण्याची दिसत आहे.
उदयनराजेंना येथून मताधिक्य न मिळाल्यामुळे अजित पवारांनी नितीन पाटलांना राज्यसभेवर घेण्याचा दिलेला शब्द पूर्ण करताना अडथळ्याची शर्यत पार करावी लागणार आहे. शिंदेंना मिळालेल्या मताधिक्याचा कळीचा मुद्दा ठरला असून भाजपच्या (BJP) नेत्यांकडून या मुद्द्यावर नितीन पाटलांचा राज्यसभेचा मार्ग अडवला जाण्याची शक्यता आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचा 32 हजार 771 मतांनी पराभव केला. सातारा, कराड दक्षिण आणि कोरेगाव मतदारसंघाने उदयनराजेंना साथ दिली. प्रत्यक्षात कराडचे दोन व पाटण मतदारसंघातून उदयनराजेंना (Udayanraje Bhosale) फारसे मताधिक्य मिळणार नाही, हे सर्वांनाच माहिती होते.
त्यामुळे सातारा व वाई मतदारसंघातील मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न झाले. वाईत मात्र, पहिल्यापासून मकरंद पाटील व त्यांचे बंधू नितीन पाटील हे पूर्ण ताकतीने उदयनराजेंच्या प्रचारात सहभागी झाले नव्हते. कारण राष्ट्रवादीच्या हक्काची सातारा लोकसभेची जागा अजित पवारांनी नितीन पाटलांसाठी महायुतीकडून मागून घेतली होती.
पण उदयनराजेंनी सातारा लोकसभेसाठी आग्रह धरल्याने त्यांच्यासाठी भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांना राज्यसभेची जागा देण्याचे केले. त्यामुळे अजित पवारांनी वाईच्या सभेत जोरदार भाषण करताना नितीन पाटलांना निकालानंतर राज्यसभेवर घेऊन खासदार केले जाईल, असा शब्द दिला होता.
पण, त्यासाठी वाई मतदारसंघातून उदयनराजेंना सर्वाधिक मताधिक्य मिळावी, ही अपेक्षा ठेवली होती. पण, महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्यामुळे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी सर्वात आधी वाई मतदारसंघात पोहोचली होती. त्यामुळे अजित पवारांनी आश्वासन देऊनही निकालात वाईकरांनी आमदार शशिकांत शिंदेंना साथ देत मताधिक्य दिले.
वाईतून शिंदेंना 6700 चे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आता अजित पवारांना नितीन पाटलांना राज्यसभेवर घेताना भाजपकडून निश्चितच मताधिक्यावर बोट ठेवले जाणार आहे. त्यामुळे नितीन पाटलांच्या खासदारकीत शिंदेंना मिळालेल्या मताधिक्याची अडचण आडवी येणार आहे. हा मुद्दा उपस्थित करुन भाजपचे नेते नितीन पाटलांचा राज्यसभेचा मार्ग अडविण्याची शक्यता अधिक आहे.
किसन वीर व खंडाळा कारखान्याला मिळणारी कर्ज थक हमीची मदत मिळण्यातही अडचण येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता याबाबत कोणती भूमिका घेणार यावर सर्व काही अवलंबून आहे. या सर्व घडामोडीत वाईतील मतदार हा शरद पवारांचा पक्षाच्या बाजूने राहिल्याचे चित्र असून आगामी विधानसभा निवडणुकीत जर शरद पवारांनी वाईतून वेगळा उमेदवार दिला, तर मकरंद पाटलांची अडचण होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.