Narendra Modi, Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : मोदींची जगभ्रमंती अदानीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी होती का : पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Prithviraj Chavan तळबीड येथे या अभियानाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदयात्रा काढून 'हात से हात जोडो' अभियानाचा प्रचार केला.

Umesh Bambare-Patil

Prithviraj Chavan News : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ साली सत्तेत आल्यापासून देशात कमी पण बाहेरच्या अनेक देशांमध्ये भेटी दिल्या. पण, आज अदानी घोटाळा बाहेर आल्यानंतर तसेच श्रीलंकेच्या अध्यक्षांनी अदानीला Adani त्यांच्या देशातील एका कामाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी मोदींनी Narendra Modi दबाव आणला, असा आरोप केला. यावरून हेच दिसून येते कि, मोदींची जगभ्रमंती ही अदानीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठीच होती का, असा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी तळबीड येथे काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानाच्या कार्यक्रमत केला.

काँग्रेसने सुरु केलेल्या हात से हात जोडो अभियान सातारा जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रभावीपणे राबविले जात आहे. तळबीड येथे या अभियानाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी पदयात्रा काढून हात से हात जोडो अभियानाचा प्रचार केला.

श्री. चव्हाण म्हणाले, गौतम अदानी हे श्रीमंतांच्या यादीत ६९० व्या स्थानी होते, पण मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांच्या मैत्रीमुळे अदानीचा नंबर तिसऱ्या क्रमांकावर आला. मोदी पंतप्रधान होण्याआधी अदानींच्या विमानातून फिरत होते आता मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदानी मोदींच्या सरकारी विमानातून फिरत आहेत.

अदानी व राहुल गांधी यांच्या मैत्रीबद्दलचे दाखले राहुल गांधी यांनी संसदेत अधिवेशनात मांडून देशाचे लक्ष वेधून घेतले पण मोदींनी त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी कोणतेतरी वेगळेच विषय संसदेत मांडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. तसेच राहुल गांधीच्या संसदेतील भाषणावर बंदी घातली व आता राहुल गांधींना केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण मागितले आहे. राहुल गांधींनी केलेले आरोप यांचे फोटो त्यांनी दाखविले होते तरी त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाईचा प्रयत्न होत आहे.

मोदी सरकार लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवीत आहेत. देशात कोणीही सरकारच्या चुकीच्या निर्णयावर व कृतीवर बोलत असेल तर त्याचा आवाज बंद करायचा प्रयत्न सुरु आहे. मोदींना संविधानाप्रमाणे वागायचे नसून स्वतःची मनमानी करायची आहे. यामुळे लोकशाही टिकविण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायची आहे यासाठी आपल्या सर्वाना एक होण्याची गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT