Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Modi Solapur Tour : आमच्या पूर्वजांकडून पाप झाले असेल, पण माझ्यासाठी ही प्रायश्चित घेण्याची वेळ; मोदी असं का म्हणाले?

Vijaykumar Dudhale

Solapur, 29 April : संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार, असा खोटा आरोप आमच्यावर इंडिया आघाडीकडून केला जातो. आज बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकणार नाहीत. मोदींचा तर सवालच नाही. मोदीकडे आज जेवढे पाहिजे तेवढे मतदान आहे. पण तो रस्ता आम्हाला मान्य नाही. शेकडो वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला. आमच्या पूर्वजांकडून पाप झाले असेल. माझ्यासाठी ही प्रायश्चित घेण्याची वेळ आहे, त्यामुळे आरक्षणासाठी जेवढी ताकद देता येईल, तेवढी ताकद देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेत बोलताना दिला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी सोलापूरमध्ये (Solapur) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेसने आंबेडकरांची राज्य घटना जम्मू काश्मीरमध्ये लागू होऊ दिली नाही. आम्ही 370 कलम हटवून ती त्या ठिकाणी लागू केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एससी, एसटी, ओबीसीचे आमदार आणि खासदार भाजपमधून झाले आहेत. इंडिया आघाडीचे लोक ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली धूळफेक करीत आहेत. इंडिया आघाडीचे लोक मला रोज शिव्या देतात. त्यांच्याकडे देशासाठीचे व्हिजनच नाही. आमच्याकडे ते व्हिजन आहे. काँग्रेसवाल्यांनी एससी एसटी आणि ओबीसी वर्गाची फसवणूक केली आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.

नरेंद्र मोदी म्हणाले, मला एवढी ताकद द्या की, काँग्रेसकडून जे षडयंत्र रचले जात आहे, ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. कर्नाटकात अल्पसंख्याकांबाबत आरक्षणाचा जो खेळ खेळण्यात आला आहे. पण आम्ही एससी, एसटी कुटुंबांना समोर ठेवून योजना बनविल्या आहेत. समाजातील सर्व वर्गासाठी आम्ही योजना बनविल्या आहेत. देशातील पिछाडीवर असलेल्या वर्गाचा संपत्तीवर पहिला हक्क आहे.

आमच्या दहा वर्षांच्या काळात पन्नास कोटींहून अधिक गरीब गरिबी रेखातून बाहेर आले आहेत. त्यासाठी नियत चांगली लागते, तरच परिणामही चांगले होतात. आदिवासींसाठी आम्ही विशेष योजना बनवली. विश्वकर्मा योजना आणली नसती. काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजना आणल्या नाहीत. या योजनांचा सर्वाधिक लाभ एससी, एसटी आणि ओबीसींना झाला आहे. मोदींची नजर काँग्रेससारखी असती तर गावं बदलली नसती, असा दावाही मोदी यांनी केला.

मोदी म्हणाले, खादी ही स्वातंत्र संग्रामाची ओळख आहे. काँग्रेसने खादीला बरबाद केले होते. आम्ही खादी पुनरुज्जीवित केली आहे. पंढरपूरच्या रेल्वे मार्गासाठी शेकडो रुपये खर्च केले आहेत. महामार्गांनी सोलापूर शहर जोडले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT