Prashant Babar
Prashant Babar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP Dispute : ‘बारामती आमची राजकीय पंढरी; पवारांवर बोललेले आम्ही सहन करणार नाही’

Vijaykumar Dudhale

सोलापूर : माझ्या नेत्यावर, पवार घराण्यावर (Pawar) आणि बारामतीवर (Baramati) डोळे वटारून कोणी बोलत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. बारामती आमची राजकीय पंढरी, आमचा तो देव आहे, त्यांच्यावर बोललेले आम्ही सहन करणार नाही. मग तो कितीही मोठा असला तरी आम्ही ते सहन करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी (NCP) युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेले प्रशांत बाबर (Prashant Babar) यांनी इशारा दिला. (We will not tolerate talking about Pawar family : Prashant Babar)

प्रशांत बाबर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव यांच्याकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आज (ता. १२ फेब्रुवारी) आयाेजित पत्रकार परिषदेत बाबर बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे सोलापूर निरीक्षक शेखर माने यांच्यावर टीका केल्याचे कारण बाबर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत देण्यात आले. त्यासंदर्भाने बाबर बोलत होते.

बाबर म्हणाले की, होय मी पक्षाच्या निरीक्षकांवर टीका केली. पण, निरीक्षकांचे काम काय, तर वस्तुस्थितीची माहिती नेत्यांपर्यंत पोचवणे. सोलापूर शहरात काय चालले आहे, हे तुम्ही कळविणार नाही, तोपर्यंत नेत्यांना काय कळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे निरीक्षकांना बोलण्याचा मला अधिकार नाही का? मी पातळी ओलांडून बोललो, असे त्यांना वाटले असेल. पण, माझ्या नेत्यावर, पवार घराण्यावर, बारामतीवर डोळे वटारून कोणी बोलत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. बारामती आमची राजकीय पंढरी, आमचा तो देव आहे, त्यांच्यावर बोलले आम्ही सहन करणार नाही. मग तो कोणी कितीही मोठा असेला तरी आम्ही ते सहन करणार नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून म्हणजेच १९९९ पासून आम्ही पवारांशी एकनिष्ठ राहिलो आहोत. आमदार रोहित पवार यांची मी दिशाभूल करतो आहे. त्यांना खोटी माहिती देतो आहे, हे रोहित पवार यांनी सांगू द्यावे ना. ते तुम्ही का सांगता? रोहित पवार यांना तुम्ही पटवून द्या की प्रशांत बाबर तुमची दिशाभूल करतो आहे, असे आव्हानही बाबर यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT