Vikramsinh Patankar
Vikramsinh Patankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan : कोथिंबिरीची पेंडी पारखून घेता... लोकप्रतिनिधी निवडताना जागरूकता कुठे जाते...

Umesh Bambare-Patil

-राजेश पाटील

Dhebewadi News : 'बाजारात कोथिंबिरीची पेंडी खरेदी करताना तीन - चार वेळा खाली वर करून निरखून पारखून घेता. मग, राजकारणात लोकप्रतिनिधी निवडताना तुमच्यातील ही जागरूकता कुठे जाते. त्या चार - आठ दिवसांच्या मजेचे परिणाम पुढील पाच वर्षे सर्वांना भोगावे लागतात, म्हणूनच जागरुक रहा,'असे आवाहन माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर Vikramsinh Patankar यांनी केले आहे.

जिंती (ता.पाटण) विभागात एक कोटी ८८ लाख ७४ हजार रुपये खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या हस्ते झाले. श्री.पाटणकर म्हणाले, ' पाटण तालुक्यात सुरवातीच्या काळात रस्ते नव्हते. आम्ही अधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेवून पायपीट करत सर्व्हे केले.

अत्यंत अवघड परिस्थिती असतानाही रस्त्याची कामे करून घेतली. आताची नेतेमंडळी मात्र, त्यावर डांबराचा थर देवून रस्ता केल्याचा डांगोरा पिटत हिंडत आहेत. सध्या उन्हाळ्यात तयार केलेले रस्ते पावसाळ्यात दिसत नाहीत, अशी स्थिती तालुक्यात आहे. असले फसवणुकीचे आणि दिशाभूलीचे राजकारण फारकाळ टिकत नाही.

नेहमी बिनविरोध निवडणुका होणाऱ्या गावात विरोधकांकडून पार्सल पोहचवून निवडणुका लावल्या जात आहेत. मतभेद निर्माण करून विध्वंस सुरू आहे. पाटण तालुक्यात पुन्हा क्रांती घडवायची वेळ आली आहे.आपसातील मतभेद बाजूला ठेवून वेगळ्या दृष्टीने राजकारणाकडे पहा.

'सारंग पाटील म्हणाले, 'खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांचे पुरावे आम्ही भूमिपूजनाला जाताना जनतेसमोर ठेवतो. हा सुर्य आणि हा जयद्रथ या भूमिकेने आम्ही चाललोय'.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT