Ram Shinde
Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विधान परिषदेवर जाणार की नाही, राम शिंदेने केले स्पष्ट

अमित आवारी

अहमदनगर - राज्यातील भाजपच्या विधान परिषदेतील चार जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी लवकरच निवडणूक होईल. या जागांसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी भाजपमधील अहमदनगर जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांची मागणी आहे. राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार होणार अथवा नाही यावर त्यांनी आज पत्रकार परिषदेत भाष्य केले. ( Whether he will go to the Legislative Council or not, Ram Shinde made it clear )

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री असलेल्या राम शिंदे यांचा पराभव केला. मागील 25 वर्षांपासून कर्जत व जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. या मतदार संघातून सदाशिव लोखंडे हे तीन वेळा तर राम शिंदे हे दोन वेळा भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. भाजपच्या या बालेकिल्ल्यात रोहित पवार यांचा विजय झाल्याने भाजपच्या बालेकिल्ल्याचे बुरुंज ढासळू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सत्ता गमवावी लागली. या मतदार संघात भाजपला पुन्हा बळ मिळवावे यासाठी राम शिंदे यांना विधानपरिषदेतील आमदार करण्याची मागणी भाजप नेते व कार्यकर्त्यांकडून होत आहे. राम शिंदे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.

राम शिंदे यांना विधानपरिषदेत पाठवावे अशी मागणी जिल्ह्यातील भाजप नेत्यांकडून होते आहे. यावर विषयी पत्रकारांनी विचारले असता राम शिंदे म्हणाले, माझी भाजप कोअर कमिटीवर निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी सत्कार समारंभ ठेवला होता. यात ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मला विधानपरिषदेवर पाठविण्याचा ठराव मांडण्यात आला होता. त्याला सर्व उपस्थितांनी एकमताने मान्यता दिली. हा ठराव भाजप प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेत्यांकडे पाठविला होता.

ते पुढे म्हणाले की, 2019च्या विधानसभा निवडणुकीत मी मोठ्या शक्तीशी लढा दिला. तरीही मला 2014च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 10 हजार मते जास्त मिळाली. विधानपरिषदेत मला पाठवावे अशी माझ्या कार्यकऱ्यांचीही इच्छा आहे. मात्र निर्णय प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांना घ्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT