Ajit Pawar, Uday Shelke, Prashant Gayakwad
Ajit Pawar, Uday Shelke, Prashant Gayakwad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अजित पवारांच्या भाषणातील प्रशांत गायकवाड व उदय शेळके कोण आहेत

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ( अहमदनगर ) : कर्जत- जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल ( शनिवारी ) झाले. यावेळी पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांच्या भाषणात अहमदनगर जिल्ह्यातील दोन नेत्यांचा उल्लेख झाला. अॅड उदय शेळके व प्रशांत गाडकवाड. या दोघांचे त्यांनी आवर्जून कौतुक केले. Who are Prashant Gaikwad and Uday Shelke?

अजित पवार यांनी कर्जत व जामखेड अशा दोन्ही ठिकाणच्या भाषणांत जिल्हा बँक, महानगर बँक व पारनेर बाजार समितीच्या कारभाराचा दाखला देत जिल्हा बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड उदय शेळके व बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांचे कौतुक केले.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, दिवंगत सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी स्थापन केलेल्या महानगर बँकेचा कारभार अध्यक्ष पदाच्या माध्यमातून उत्तम रित्या अ‍ॅड. उदय शेळके पहात आहेत. एका शेतकऱ्याने स्थापन केलेल्या बँकेची मुंबई सारख्या ठिकाणी स्वमालकीच्या जागेत मोठ्या स्वरूपात कार्यालयाचे काम सुरू आहे. ही भूषणावह बाब आहे. महानगर बँकेच्या कारभाराचा अनुभव असल्याने त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा दिली आहे. तरुण व चांगले काम करू शकणाऱ्यांना पुढे आणले पाहिजे. विरोधी पक्षाचे सदस्य तेथे संचालक असूनही सर्वांना बरोबर घेऊन ते कारभार पहात आहेत.

पारनेर तालुका बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनीही कारभार उत्तम रीत्या ते सांभाळत आहेत. आताही जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी त्यांना मिळाली आहे. मात्र काही विरोधी संचालकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीचा धागा पकडून पारनेर तालुक्यातील जिल्हा बँक संचालक प्रशांत गायकवाड यांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, प्रशांत तुम्ही एकट्या पारनेरचे संचालक नसून संपूर्ण जिल्ह्याचे संचालक आहात. त्यामुळे जामखेडला विशेष लक्ष ठेवा. त्यासंबंधी अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके यांच्याशी मी बोलतो, असे सांगत पारनेर बाजार समितीत प्रशांत गायकवाड यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले.

प्रशांत गायकवाड हे राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी सबाजीराव गायकवाड यांचे पुत्र आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पारनेर मतदार संघातून प्रशांत गायकवाड हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. असे असूनही त्यांनी पक्ष निष्ठा सोडली नाही. याचे फळ त्यांना जिल्हा बँक निवडणुकीत मिळाले.

कोण आहेत गुलाबराव शेळके

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेनसारख्या ग्रामीण भागातून मुंबईत रोजगारासाठी जाऊन उच्च शिक्षण घेतले.त्यासाठी रात्रशाळेत जाऊन शिपायाची नोकरी केली. सावकारशाहीतून गरिबांची पिळवणूक थांबवण्यासाठी त्यांनी महानगर बँक काढली. मुंबई शहरासह राज्यातील अनेक भागात विविध शाखेच्या माध्यमातून बँकेचा कारभार सुरू आहे. 77 हजार 452 सभासद संख्या या बँकेची आहे. दिवंगत सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांच्या नंतर अ‍ॅड. उदय शेळके हे बँकेचा कारभार पाहत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील मातब्बरांना डावलत राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा तरुण उदय शेळकेंच्या हाती दिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांच्या निकटवर्तीयमध्ये गुलाबराव शेळके यांचे नेहमी नाव घेतले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT