Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Political News : माणचा आमदार, माढ्याचा खासदार ठरवणारे रामराजे कोण...जयकुमार गोरेंचा सवाल

Jaykumar Gore सातारा शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार जयकुमार गोरे बोलत होते.

Umesh Bambare-Patil

Maan Political News : माढा लोकसभेचा खासदार कोण आणि माण विधानसभेचा आमदार कोण पाहिजे हे येथील मतदारराजा ठरवेल. हा निर्णय घेणारे रामराजे कोण, अशी टीका आमदार जयकुमार गोरे यांनी केली. दरम्यान, दुष्काळी माण तालुक्यावर शरद पवारसाहेब आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनीच अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणांच्या पाणी फेरवाटपाचा घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

सातारा शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore बोलत होते. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अविनाश कदम, सुनील काटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार रामराजे निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांनी माण मतदारसंघात आम्हाला नको आहेत, त्यांना आम्ही बाजूला ठेवणार असे वक्तव्य केलं होते.

त्यावर आमदार गोरे म्हणाले, ते ठरवणारे कोण, आम्ही त्यांच्या छातीवर बसून तीन टर्म आमदार झालो आहोत. कोणाला खासदार करायचे कोणाला आमदार करायचे हे माढा लोकसभा आणि माण मतदारसंघातील जनता ठरवेल. मैदानात लढताना समोर विरोधक कोण आहे हे ठरवून आम्ही लढत नसतो.

कोणीही आमच्या विरोधात असो आम्ही त्याला आस्मान दाखवतोच. आमच्यासमोर कोणी का असेना. आम्हाला काही फरक पडत नाही. आमदार गोरे म्हणाले, जयंत पाटील यांनाही मी काल जे काही बोललो तेच आजही बोलतो आहे. त्यांच्याबाबतीत मी सर्जनशील अशीच भाषा वापरली आहे. त्यांनी जे काय केले त्यावरच मी बोललो आहे.

आजपर्यंत दुष्काळी माण तालक्याला दुष्काळीच ठेवण्याचे काम शरद पवारसाहेब आणि तत्कालिन कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे, असाही त्यांनी आरोप केला. दरम्यान, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती देत त्यांचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

बावनकुळे बुधवारी साताऱ्यात...
भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा येत्या चार तारखेला साताऱ्यात येत आहेत. सकाळी १० वाजता वाई तालुक्यातील बावधन येथे त्यांचे स्वागत होईल. तेथून ते साताऱ्यात कनिष्क मंगल कार्यालयात येतील. तेथे ३०० पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. तेथून यशोदा कॅप्मस येथे भेट देतील.

सातारा शहरात मोती चौक ते जुना मोटर स्टँड अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये ते जनतेशी संवाद साधतील. तेथून ते कराडला रवाना होतील. कराडात त्यांचे जंगी स्वागत होईल. कराड येथील वेण्णूताई चव्हाण सभागृहात कोअर कमिटीची बैठक होईल. त्यानंतर आझाद चौकापासून ते पायी पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधतील, असे त्यांनी सांगितले.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT