Shivendraraje Bhosale, Shambhuraj desai
Shivendraraje Bhosale, Shambhuraj desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सातारचा पालकमंत्री कोण : शिवेंद्रसिंहराजे की शंभूराज देसाई

Umesh Bambare-Patil

सातारा : राज्यातील सत्ताबदलानंतर आता नव्या सरकारमध्ये स्थान कोणाला मिळणार यावर अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. तर साताऱ्यात मात्र, पालकमंत्री कोण होणार आहे याची चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ दिल्याने शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्रीपदासह पालकमंत्री पदाची अपेक्षा आहे. तर फडणवीसांनी निवडणुकीत दिलेला शब्द म्हणून शिवेंद्रसिंहराजेंना पालकमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदावरून सेना, भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

भाजप, एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर होत आहे. या नवीन सरकारमध्ये कोणाला मंत्रीपदी संधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. बंडाला साथ दिल्याने एकनाथ शिंदेंसोबत असलेल्यांना संधी दिली जाणार आहे. यामध्ये गृहराज्यमंत्री असूनही बंडात सहभागी झाल्याबद्दल शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच साताऱ्याचे पालकमंत्री पद मिळावे, अशीही त्यांची इच्छा आहे.

तर दुसरीकडे शिवेंद्रसिंहराजेंना फडणवीसांकडून निवडणुकीवेळी दिलेला शब्द यावेळेस ते पाळला जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद तसेच पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना व भाजप कडूनही पालकमंत्री पदासाठी आग्रह राहिल्यास संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनाही फडणवीसांनी शब्द दिलेला होता. त्यामुळे त्यांना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद दिले जाणार हेही तितकेच महत्वाचे आहे.

यापूर्वी कोणत्याही मंत्री मंडळात सातारा जिल्ह्याला दीड मंत्रीपद मिळालेले आहे. त्यामुळे आता या नव्या मंत्रीमंडळात एक कॅबिनेट तर दुसरे राज्यमंत्रीपद दिले जाईल. मात्र, पालकमंत्री पदावरून सेना, भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT