Ramraje Naik Nimbalkar, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan Ramraje Nimbalkar News : शरद पवारांची साथ का सोडली, रामराजेंनी स्पष्टच सांगितले

Phaltan News कोळकी (ता. फलटण) येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण व प्रारंभप्रसंगी रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते.

Umesh Bambare-Patil

Phaltan Political News : फलटण तालुक्यातील राजकीय संस्कृती बिघडत चालली आहे. सध्या जी संस्कृती दिसते, ती दहशतीची आहे. त्यामुळे केवळ कार्यकर्त्यांना या दहशतीपासून वाचविण्यासाठी शरद पवार यांचे आपल्यावर अनंत उपकार असतानाही त्यांना दुखावून वेगळा राजकीय निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट मत माजी सभापती व आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोळकी (ता. फलटण) Phaltan News येथील विविध विकासकामांचे लोकार्पण व प्रारंभ रामराजे नाईक-निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, पुंडलिक नाळे, सचिन रणवरे, सरपंच स्वप्ना कोरडे, उपसरपंच विकास नाळे, ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

आज धोम-बलकवडीचा उल्लेख केला जातो. जर शरद पवार नसते, तर हा प्रकल्प झालाच नसता. हे आपण वेळोवेळी बोललो असल्याचे सांगून रामराजे म्हणाले, ‘‘शरद पवार यांचे माझ्यासह तालुक्यावर अनेक उपकार आहेत. महत्त्वपूर्ण विकासकामांवर त्यांची छाप आहे.

तरीही तालुक्यातील राजकीय दहशत संपविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मालोजीराव नाईक-निंबाळकर यांसारख्या विभूतींच्या सुसंस्कृत विचारांचा वारसा आहे. त्यामुळे पुढील काळातील नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे? हा खरा प्रश्न जिल्ह्यासमोर आहे. Maharashtra Political News

यामुळे आपल्याला सावध पावले टाकावी लागतील. राज्यात तीन पक्षांचे नेतृत्व आहे. त्यामुळे विरोधकांशी तडजोड करायची का? अशी धास्ती कार्यकर्त्यांत आहे; परंतु स्थानिक संस्थांच्या निवडणुकांत आघाडी टिकत नाही.

त्यामुळे फलटणचे राजकारण हे आपल्याच पद्धतीने होणार व होत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपली वाट ही भविष्याची व विकासाची आहे. या संस्कृतीत विकासाचं काम करणं ही आपली ‘जात’ आहे. तोच आपला ‘धर्म’ आहे,’’ असेही सांगितले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT