Hasan Musrif
Hasan Musrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विधवा प्रथा केली बंद; हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास मंत्र्यांकडून अभिनंदन..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये ठेऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केली. आता अन्य ग्रामपंचायतींना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. जुन्या बुरसटलेल्या प्रथा परंपराना विज्ञानवादी युगामध्ये स्थान असता कामा नये, असे सांगून राज्यातील अन्य ग्रामपंचायतीनी हेरवाड ग्रामपंचायतीचे अनुकरण करून तसा ग्रामसभेने ठराव करावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या हेरवाड ग्रामपंचायतीने पाच मे 2022 रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. या ग्रामपंचायतीने केलेल ही कृती स्तूत्य असल्याने या ग्रामपंचायतीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिनंदन केले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, आज कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी अधिकारांचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते.

त्यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाप्रमाणेच अन्य ग्रामपंचायतींनी या निर्णयास आदर्श मानून समाजातील कुप्रथा बंद करून महिलांचे जीवन सुकर आणि आनंदी करण्याचे समाजोपयोगी निर्णय घ्यावेत, असेही आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. या संदर्भातील परिपत्रक ग्रामविकास विभागाने निर्गमित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT