Ranjitshinh Mohite Patil-Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? पालकमंत्री जयकुमार गोरेंचे मोठे विधान...

Jaykumar Gore Statement : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सख्खे मित्र असलेले गोरे हे मोहिते पाटील यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण सोलापूरचे लक्ष असणार आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 23 January : माढा लोकसभा मतदारसंघातील माण खटावचे आमदार तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालकमंत्री झाले आणि मोहिते पाटील यांच्या अनुषंंगाने चर्चेचे वादळ उठले आहे. पुण्यात आढावा बैठक घेतल्यानंतरही मोहिते पाटील यांच्या संदर्भाने त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. आज सोलापुरात आल्यानंतरही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरील कारवाईसंदर्भात जयकुमार गोरे यांनी मोठे भाष्य केले आहे.

पालकमंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे हे आज प्रथमच सोलापूर शहरात आले होते. सोलापुरात त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitshinh Mohite Patil) यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी मोठे विधान करताना ‘चिंता करू नका, आगे आगे देखो होता हैं क्या..’ असे म्हणून मोहिते-पाटलांना अप्रत्यक्ष इशारा दिला.

पुण्यात त्यांना मोहिते पाटील यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमच्यावर देण्यात आली आहे, या अनुषंगाने विचारण्यात आले होते, त्या वेळी जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सोलापूरच्या पालकमंत्रिपदी माझी नियुक्ती ही कोणाचाही बंदोबस्त करण्यासाठी झालेली नाही, असे म्हटले होते, त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सख्खे मित्र असलेले गोरे हे मोहिते पाटील यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण सोलापूरचे लक्ष असणार आहे.

जयकुमार गोरे म्हणाले, मी स्वतःला भाग्यवान समजतो की सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची जबाबदारी मला दिली. विठुराया आणि सिद्धेश्वरांचा हा जिल्हा आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद. आज जिल्ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील प्रश्न समजून घेतोय. सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे, त्यावर काम करणे गरजेचं आहे.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 100 दिवसात 20 लाख घरांना मान्यता देण्यात आलेली आहे, त्यातील पहिला हप्ता लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. जी जबाबदारी दिली आहे ती इमानदारीने आणि तेवढ्याच ताकदीने निभावण्या प्रयत्न करणार आहे. मला पालकमंत्री होऊन 4 ते 5 दिवस झालेले आहेत, मात्र इथे येण्यागोदर तुम्हाला कळवलं जाईल आणि तुम्हाला नियमित पालकमंत्र्यांना भेटता येईल. माढा लोकसभा मतदारसंघातील मी आहे, त्यामुळे भेटत राहू, असा शब्दही गोरे यांनी दिला.

ते म्हणाले, शंभर दिवसांत 10 लाख लखपती दीदी बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत. विमानसेवेचा प्रश्न 100 दिवसाच्या आत मार्गी लावू. केंद्रीय उड्डाणमंत्री माझ्या खूप जवळचे आहेत. याबाबत वेळ आली, तर दिल्लीतही बैठक लावू. माझा मतदारसंघ माण-खटावमध्ये पिढ्यानंपिढ्या दुष्काळ होता. मतदारसंघातील 80 टक्के गावात पाणी नव्हतं. 70 गावांना कनेक्टिविटी नव्हती. आज 70 टक्के भाग पाण्याखाली आहे आणि 100 टक्के कनेक्टिविटी आहे. हे करायला मला 15 वर्षे लागली आहेत. सोलापूर विमानतळ आणि दुहेरी पाईपलाईनचा मुद्दा माझ्या पालकमंत्रिपदाच्या कार्यकाळात पूर्ण व्हायचा होता; म्हणून एवढे दिवस होऊ शकला नाही.

कुठल्याही किंमतीवर कायदा हातात घेऊ देणार नाही आणि कोणाला गृहीत धरू नये, असा इशाराही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. सोलापूर फलकाबाबत गोरे म्हणाले, माझा कार्यकर्ता चुकला असेल तर मी त्याचं समर्थन करणार नाही. बॅनर लावल्यानंतर काढण्याऐवजी लावलाच जाऊ नये, यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी, त्यामुळे कायद्याचे पालन नेता, कार्यकर्ता आणि अधिकाऱ्यांनाही लागू नये. बॅनर लावायला परवानगी नसेल तर त्यावर कारवाई होईल.

माढ्याच्या प्रांताधिकाऱ्यांना वाळू माफियांनी केलेल्या धक्काबुक्कीवर गोरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, वाळू तस्करांचे प्रांत अधिकाऱ्यापर्यंत पोहोचयचं धाडस होत असेल तर हे फार गंभीर आहे. मात्र, प्रशासन याबाबत दखल घेईल, त्याबाबतच्या सूचना मी केलेल्या आहेत. सोलापूरला तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी एक प्लॅन होणं गरजेचं आहे, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाओस दौऱ्यातून महाराष्ट्राला खूप मिळेल, त्यात सोलापूरचाही नंबर लागावा, असं मला वाटतं, असे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT