Sharad Pawar on Devendra Fadnavis
Sharad Pawar on Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar On Devendra Fadnavis: फडणवीसांना निपाणीतूनच उत्तर देईल: 'त्या' टीकेवर पवार स्पष्टच बोलले...

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar replied Devendra Fadnavis: राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्यांचं काय करायचं ते मी बघतो. निपाणी येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चांगलाचं समाचार घेतला आहे.

मी निपाणीला जाणार आहे. कोण पार्सल आहे, हे देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) निपाणीतूनच सांगेन. या संदर्भात मी बोलणार आहे, अशी प्रतिक्रीया शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवार निपाणीतील सभेत फडणवीसांच्या टीकेला काय उत्तर देणार? याकडेच सर्वांच लक्ष असेल. (Latest Marathi News)

यावेळी त्यांनी राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावरही भाष्य केलं आहे. कार्यकर्त्यांसाठी मी निवृत्तीचा निर्णय बदलला. महाराष्ट्राचं राजकीय चित्र वेगाने कसं बदलेल यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्हाला काम करावं लागेल, लोकांच्या सुखदुखाशी समरस व्हावं लागेल. पण ते केल्याशिवाय अपेक्षा करणं योग्य नाही. असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच, महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे. त्याचबरोबर देशात मोदींना पर्याय देण्याची गरज आहे, असंही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. (Maharashtra Politics)

कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आपलेच उमेदवार निवडून यावेत यासाठी भाजप -काँग्रेससह सर्व स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपचा प्रचार केला. निपाणीमध्ये त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीकाही केली. आता या टीकेला शरद पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT