Nilesh Lanke News, Dr. Sujay vikhe News, Ahmednagar News in Marathi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

2024मध्ये सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके अशी लढत होणार का?

लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांना उमेदवारी मिळण्याचे कयास लावले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पारनेरचे आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांना उमेदवारी मिळण्याचे कयास लावले जात आहेत. या कयासावर अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी सरकारनामाला दिलेल्या विशेष मुलाखतील महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ( Will Nilesh Lanke play against Sujay Vikhe in 2024? )

कोविड काळात राज्यभर प्रसिद्ध झालेले आमदार नीलेश लंके यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस देऊ शकते, असे कयास लावले जात आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार लंके यांना तसा शब्दही दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विखे विरूद्ध लंके अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. (Ahmednagar News in Marathi)

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, पुढील उमेदवार कोण असेल याला मी लक्ष देत नाही. कागदावर आणि वास्तविकतेत मोठा फरक आहे. नगर जिल्ह्यातील राजकारण असेच खेळते. नगर जिल्ह्याचे ते वैशिष्ट्य आहे. तुम्ही कागदावर विविध पक्षांचे पदाधिकारी दिसतात मात्र जेव्हा निवडणूक लागते त्यावेळी तुम्हाला कळेल कोण-कोणाच्या बरोबर राहील.

ते पुढे म्हणाले की, नगर जिल्हा हा वैचारिक जिल्हा आहे. तो कर्तृत्त्ववान माणसाला संधी देतो. मी जेव्हा संग्राम जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढविली त्यावेळी ते शहराचे आमदार होते तर मी मतदार संघात मतदारही नव्हतो. मात्र जनता माझ्या बरोबर उभी राहिली, असे त्यांनी सांगितले.

संग्राम जगताप यांच्या मैत्रीबाबत त्यांनी सांगितले की, मी त्याच लोकांशी बोलू शकतो ज्यांना माझे बोलणे कळते. ज्यांना माझे बोलणे कळत नाही, त्यांच्याशी बोलून मी माझा वेळ वाया घालत नाही. आमदार रोहित पवार माझे शत्रू नाहीत. मित्र आहे की नाही यावर मी भाष्य करणार नाही. नगर जिल्ह्यात चित्र दिसते तसे नसते. नगर जिल्ह्याचे राजकारण वेगळे आहे. एखादा व्यक्ती प्रसारमाध्यमांत दिसत असेल, सोशल मीडियावर असेल तो लोकांच्या मनात असेल असे अजिबात नाही, असा टोलाही त्यांनी लंके यांनी लगावला.

मला कोणी बिनविरोध खासदार करणार नाही. कोणी तरी उभे राहणार आहे, मग संग्राम जगताप असो, रोहित पवार असो अथवा कोणीही असो. कोणता उमेदवार द्यायचा हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मी कोण विरोधात उभे राहणार त्यावर रणनीती आखत नाही. मी माझ्या कामाच्या जोरावर लोकांना आवाहन करेल. लोकांना योग्य वाटले, निवडून देतील. लोकांना अयोग्य वाटले तर पाडतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT