NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News
NCP Chief Sharad Pawar Latest Marathi News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

एका जागी बसणं जमलं नसतं म्हणून राष्ट्रपतिपदाची उमेदवारी नाकारली : पवारांचा खुलासा

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar: राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक (Presidential election) लढवावी, असा भाजप (BJP) वगळता देशातील राजकीय पक्षांनी आग्रह केला होता. पण अखंड एका जागी बसणे, लोकांत न मिसळणे, हे जमले नसते. त्यामुळे राष्ट्रपतिपदाचा उमेदवार झालो नाही,’असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी (ता. १०) येथे माध्यमांशी बोलताना दिले. याबरोबरच आगामी निवडणूका महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून एकत्र लढवाव्यात, असे माझे मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून द्रौपदी मुर्मू, तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. पवार म्हणाले, मी उमेदवारी स्वीकारावी म्हणून सर्व पक्षांनी आग्रह केला होता. काही गणितेही मांडून दाखवली होती. मात्र, माझ्यासह सहकाऱ्यांचे मत होते की, उमेदवारी स्वीकारू नये, असा त्यांनी सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, जर यामध्ये यश आले असते तर माझ्यासारख्या माणसाला अखंड एका ठिकाणी बसणे, कुठेही न जाणे, लोकांशी सु-संवाद न ठेवणे आदी गोष्टी त्रासदायक झाल्या असत्या. त्यामुळे हा आपला रस्ता नाही. त्यामुळे उमेदवारी नाकारली असल्याचे त्यांनी सांगितले. आता या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान कसे होईल, याकडे लक्ष देत आहोत. या संदर्भात दिल्लीत दोन बैठकीही घेतल्या असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT