Ranjit Nimbalkar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjit Nimbalkar News : माढ्याचे खासदार निंबाळकरांना महिलेचे आव्हान; म्हणाल्या, देशमुख बंधूंना पाठीशी घालाल तर...

Solapur Politics : ...मग खासदार निंबाळकर तुम्हांला या दोन भावांचा इतका पुळका का?

सरकारनामा ब्यूरो

Solapur : माढा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना आव्हान देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका महिलेनं भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या श्रीकांत देशमुखांवरुन आरोप केले आहेत. याचवेळी या संबंधित महिलेनं जर श्रीकांत देशमुख व शशिकांत देशमुख यांना पाठीशी घातलं तर पंतप्रधान मोदींकडे तक्रार करणार असल्याचा गर्भित इशारा खासदार निंबाळकरांना दिला आहे.

संबंधित महिला सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या स्वत:चं नाव निर्मला श्रीकांत देशमुख असें सांगत आहे. त्या म्हणाल्या, खासदार रणजित निंबाळकर(Ranjit Nimbalkar) हे उद्या सांगोल्याच्या दौऱ्यावर येत आहे असं समजतंय. पण यावेळी शशिकांत देशुमुख व श्रीकांत देशमुख या दोघांना पाठीशी घातलं तर गाठ माझ्याशी आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कोणतेही नेते, पदाधिकारी या दोन्ही भावांना पाठीशी घालत नाही. मग खासदार निंबाळकर, तुम्हांला या दोन भावांचा इतका पुळका का असंही या व्हिडीओतील महिला म्हणत आहे. जर तुमच्या कार्यक्रमात ते दिसले तर मी व्यासपीठावर येऊन धिंगाणा घालेल असा इशाराही या महिलेनं दिला आहे.

तसेच आत्तापर्यत आपण खूप ढवळाढवळ केली.पण यापुढे जर आपण ढवळाढवळ केली तर मी नरेंद्र मोदींपर्यच पोहचायलाही घाबरणार नाही. जनतेसमोर जे काही सत्य आहे ते यायलाच हवं असंही ही महिला व्हिडीओत म्हणाली आहे

...अन् जिल्हाध्यक्षपद सोडावे लागले!

भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी लग्न करतो असे सांगून फसवणूक तसेच बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणावरून बरेच राजकीय वादंग निर्माण झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुख यांची भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशमुख यांचा व्हिडीओ व्हायरल...

श्रीकांत देशमुख आणि महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात संबंधित महिला देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तसेच याशिवाय संबंधित महिला आणि देशमुख यांच्यात भ्रमणध्वनीवर झालेला १७ मिनिटांचा संवादही व्हायरल झाला आहे.

श्रीकांत देशमुख कोण?

श्रीकांत देशमुख हे मूळचे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते होते. दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी ताकद दिल्यानंतर ते २००४ साली प्रथमच जिल्हा परिषद सदस्य झाले होते. नंतर जनसुराज्य पक्ष आणि पुढे भाजप असा त्यांचा प्रवास झाला आहे. २०१४ साली सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या विरोधात त्यांना भाजपने उभे केले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT