Rupali chakankar, Chitra Wagh
Rupali chakankar, Chitra Wagh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chitra Wagh: अखेर चित्रा वाघांच्या पोटातलं ओठावर आलंच; म्हणाल्या,''महिला आयोगाच्या अध्यक्षपदी...''

सरकारनामा ब्यूरो

Chitra Wagh On Rupali Chakankar: गेल्या काही दिवसांत अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. वाघ आणि उर्फी यांच्या वादात आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही लक्ष्य करण्यात येत आहेत. यानंतर महिला आयोगाकडून वाघ यांना नोटीस पाठविण्यात आली. या नोटिशीनंतर संतापलेल्या चित्रा वाघांनी (Chitra Wagh) महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चुकीची व्यक्ती बसली असल्याचं म्हणत रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र सोडले आहे.

चित्रा वाघ यांना सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. वाघ म्हणाल्या, महिला आयोग ही एक स्वतंत्र आणि महिलांच्या हक्कांसाठी काम करणारी संस्था आहे. अध्यक्षपदी बसलेली व्यक्ती चुकीची असली तरी महिला आयोगावर आमचा विश्वास आहे. आणि असल्या नोटिशींना मी घाबरत नाही. असल्या छप्पन नोटिसा येतात. त्यामुळे मी नोटीसला माझ्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे. महिला आयोगानं पाठवलेल्या नोटिशीचं उत्तर दिलं आहे असंही वाघ यांनी ठणकावलं आहे.

मात्र, रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाहीत. तर महिला आयोगाला सदस्य असतात. एवढंच नव्हे तर राज्याचे पोलीस संचालकही महिला आयोगाचे सदस्य आहेत. त्यामुळे चाकणकरांनी कुणाशी बोलून नोटीस पाठवलीय की आपली आपण पाठवली हे प्रश्न अनुत्तरित आहेत. येत्या दिवसांमध्ये टप्प्या टप्प्याने सगळ्या गोष्टी समोर आणू असंही विधान वाघ यांनी केली आहे.

शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी न दिल्यामुळे टीका केली जात आहे. विरोधकांकडून देखील हाच मुद्दा उचलत शिंदे सरकारवर वारंवार टीकेची झोड उठवली जात आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याच विषयावर भाष्य केलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात किमान 3-4 महिलांना संधी द्यायला पाहिजे अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT