Yashvantrao Gadakh
Yashvantrao Gadakh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

यशवंतराव गडाख यांनी सवंगड्यांसह घेतला आमटी, भाकरीचा आस्वाद

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठाणचे प्रमुख महंत उध्दव मंडलिक महाराज सोनई येथील जगदंबादेवी मंदिरात एका कार्यक्रमास आले होते. अध्यात्माच्या गोडी प्रमाणेच तेथील अन्नदानात असलेल्या गोडीची आठवण आली आणि लगेचच जेष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी सवंगड्यांसह सदगुरु नारायणगिरी वारकरी शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट देत तेथील आमटी,भाकरीचा मनसोक्त स्वाद घेतला. अध्यात्म आणि साहित्याची ही अपूर्व भेट भक्तांना चांगलीच भावली. Yashwantrao Gadakh tasted Amti, bhakari with his peers

त्यावेळी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी आपल्या भाषणात आश्रमातील आमटी, भाकर व बेसनवडीची चव आजही आहे, असे सांगितले. महंत मंडलिक यांनी आपल्या भाषणात गडाखांना आश्रम भेट व स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले. या चवदार भाषणांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले होते.

जेष्ठ नेते गडाखांनी नेवासे बुद्रुक येथील आश्रमास भेट देऊन तेथे वारकरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी हितगुज करत संवाद साधला. मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले, तुकाराम नवले, कारभारी वाखुरे, अॅड. काका गायके, आण्णासाहेब पटारे, बाळासाहेब कोकणे आदी उपस्थित होते. आमटी, भाकर, ठेचा, बेसनवडी, भजी हा जेवणाचा बेत सर्वांच्या पसंतीस उतरला.चवदार आमटीचे कौतुक करताना भाषणाची फोडणी सुध्दा चवदार झाली.

महंत उध्दव महाराज यांनी अध्यात्मिक शिक्षणाला शालेय शिक्षणाची जोड देत चांगली पिढी घडवत आहेत.येथील प्रेम,आपुलकी आणि स्नेहभाव पाहून मनाला समाधान लाभले.

- यशवंतराव गडाख,जेष्ठ साहित्यिक

मनोबल व आत्मबल उत्तम असेल तर संकटावरही मात करणे शक्य आहे हे गडाख साहेबांनी सिध्द केले आहे.त्यांनी कठीण प्रसंगात उभ्या केलेल्या संस्था आज राज्यात नावारुपाला आल्या.हे ॠषीतुल्य कार्य तालुक्यास भुषणावह आहे.

- महंत उध्दव महाराज मंडलिक,नेवासे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT