Congress Party  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress Politics: युवा नेत्याकडे माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाची धुरा; खचलेल्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस दाखवणार ?

Karad News: विधानसभा निवडणुकीपूर्वी बालेकिल्ला असलेला कराड दक्षिण मतदारसंघ हा आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे काँग्रेसची जिल्ह्यातील विधानसभेची ती जागाही गेली.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad News: विधानसभा निवडणुकीपूर्वी बालेकिल्ला असलेला कराड दक्षिण मतदारसंघ हा आता भाजपच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे काँग्रेसची जिल्ह्यातील विधानसभेची ती जागाही गेली. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात काँग्रेसची मलकापुर, कराडमधील अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपशी जवळीक साधली आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसच्या (Congress) पडत्या काळात पक्षानेही आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगलपालिकांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

एकेकाळी काँग्रेसला बालेकिल्ला म्हणून कराड दक्षिण मतदारसंघ ओळखला जात होता. पण आता तो भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. काँग्रेसच्या पडत्या काळात यापूर्वीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसची साथ सध्या सोडली आहे. यास्थितीत काँग्रेसच्या कराड दक्षिण तालुकाध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सदस्य नामदेव पाटील यांची निवड झाली आहे. यापुढील काळात संघटना बांधणीचं मोठ आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

कराड दक्षिण मतदारसंघ हा पहिल्यापासून आजअखेर काँग्रेसच्या विचारांचा राखण्यात नेत्यांना यश आले आहे. या मतदारसंघाचे आत्तापर्यंत फक्त यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण या तीनच नेत्यांनी नेतृत्व केले.

सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघापैकी कराड दक्षिण हा एकमेव काँग्रेसचा मतदारसंघ होता. त्या मतदार संघावर वर्चस्व ठेवण्यासाठी आमदार चव्हाण यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांना अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या रयत संघटनेचीही साथ दिली. मात्र, यावेळी त्यांना यश आले नाही.

सध्या माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांना कऱ्हाड दक्षिणच्या अध्य़क्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यापुढे आगामी निवडणुकीसाठी संघटना बांधणीचे मोठे आव्हाण असणार आहे.

कराड दक्षिण म्हणजे काँग्रेस अशी मतदारसंघाची ओळख खंडीत करण्यासाठी अतुल भोसलेंकडून जोरदार प्रयत्न भाजपच्या (BJP) माध्यमातून सुरु आहेत. इतिहासात पहिल्यांदाच उदयनराजे भोसलेंच्या रुपानं गेल्या वर्षी भाजपचा खासदार निवडून आला आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही कराड दक्षिणमध्ये भाजपचा आमदारही निवडून आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT