Chandrakant Walavi  Sarakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Zhadani Land Purchase case : तब्बल 620 एकर जमीन विकत घेणारे चंद्रकांत वळवी म्हणतात, सर्वसामान्य माणसाला त्रास तोच मलाही..

Chandrakant walvi News : माझ्याकडून कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. त्याबद्दल आमच्या विरोधात कारवाई होत आहे. शासनास सहकार्य करण्याचीच आमची भूमिका असेल, असे चंद्रकांत वळवी यांनी स्पष्ट केले.

Umesh Bambare-Patil

620 Acre Land Purchase : झाडाणी प्रकरणाच्या सुनावणीला आज जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, संगीता वळवी, अरमान वळवी यांच्यसह संबंधितांनी आपले म्हणणे मांडले. तसेच काही कागदपत्रेही सादर केली. तसेच आणखी काही कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांनी मुदत मागून घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 29 जुलै ही तारीख देताना म्हणणे मांडण्यासह कागदपत्रे सादर करण्याची ही शेवटची संधी असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, माझ्याकडून कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. त्याबद्दल आमच्या विरोधात कारवाई होत आहे. शासनास सहकार्य करण्याचीच आमची भूमिका असेल, असे चंद्रकांत वळवी (Chandrakant walvi) यांनी स्पष्ट केले. (Satara News)

झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल 620 एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी विकत घेतल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पहिल्यांदा तिघांना आणि नंतर आठ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आज अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यापुढे सुनावणी झाली. या वेळी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, संगीता वळवी, अरमान वळवी, यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

गुरुवारी त्यांनी आपले म्हणणे मांडले आणि काही कागदपत्रे सादर केली. मात्र, आणखी काही कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली. यावर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी २९ जुलै ही तारीख देत ही कागदपत्र सादर करण्याची ही शेवटची संधी असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, चंद्रकांत वळवी यांच्याशी आज पत्रकारांनी संवाद साधला असता ते म्हणाले, आम्ही शासनाचे आदेश पाळत आहोत. मला माझ्या कामाच्या व्यापामुळे सुनावणीची पुढची तारीख मागितली आहे. त्यानुसार त्यांनी 29 जुलै ही तारीख दिली आहे. शासनाने जे करायल हवं ते होत आहे.

यासंदर्भात विधान परिषदेत (Vidhan Parishad) चर्चा झाली आहे. त्यामुळे याबाबत शासन योग्य ती कारवाई करेल, अशा प्रकरणात ज्यापद्धतीने सर्वसामान्य माणसाला त्रास होतो, त्याप्रमाणे मलाही होत असावा. माझ्याकडून कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. त्याच्याबद्दल आमच्या विरोधात कारवाई होत आहे. तरीही शासनास सहकार्य करण्याची आमची भूमिका असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT