Ranjitsinh Disale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

डिसले गुरूजींना नोटीस बजावणारे शिक्षणाधिकारीच आता आले अडचणीत

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या प्रकरणामुळे शिक्षणाधिकारी किरण लोहार चर्चेत आले होते.

सरकारनामा ब्युुरो

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे अडचणीत आले आहेत. डिसले गुरुजींच्या विरोधात जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) कठोर भूमिका घेतली आहे. आता डिसले गुरुजींना नोटीस बजावणारे शिक्षणाधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिक्षक समायोजनात आर्थिक उलाढाल झाल्याच आरोप खुद्द जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी केला आहे. (Ranjitsinh Disale News)

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रामथिक शिक्षण विभागाने मागील आठवड्यात समायोजनातून 71 शिक्षकांच्या बदल्या केल्या. यातील 54 बदल्या या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तर 17 बदल्या या विभागीय आयुक्तांकडे केलेल्या अपलिनुसार झाल्या. या बदल्यांमध्ये आर्थिल उलाढाल झाल्याचा आरोप सभापती डोंगरे यांनी केला आहे. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

या सर्व प्रकरणामुळे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. आता पुन्हा शिक्षण विभागाकडे बोट दाखवले जात आहे. याचबरोबर शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांच्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले की, शिक्षक बदल्यांचे अधिकार मला नाहीत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र शिक्षकांना नियुक्त्या देण्याचा प्रस्वाव प्रशासनाने पाठवला होता. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिकारात या नियुक्त्या झालेल्या आहे. यावर प्रशासनच आता निर्णय घेईल.

डिसले गुरुजी प्रकरणात जिल्हा परिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. डिसले गुरुजींच्या संदर्भात 2021 मध्ये झालेल्या चौकशीचा अहवाल प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठविला आहे. हा विषय संवेदनशील असल्याने याची पडताळणी करण्याच्या सूचना स्वामी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिल्याचे समजते. डिसले गुरुजी यांचा माफीनामा, पाच जणांच्या चौकशी समितीचा अहवाल या बाबी जिल्हा परिषद बारकाईने व काटेकोरपणे हाताळत आहे.

या सर्व प्रकरणात डिसले गुरुजींनी अडचणीत येताच माफीनामा सादर करून या वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना डिसले यांनी दोन पानी पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली होती. यापुढे थेट प्रसारमाध्यमांसमोर जाणार नाही, अशी कबुलीही डिसले यांनी दिली होती. त्यांनी आता माफीनामा सादर करीत हे प्रकरण थांबवण्याची मागणी केली आहे. डिसले यांच्या माफीनाम्याची जोरदार चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT