DJ : राज्यात लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे, तत्पूर्वीच पुण्यामध्ये या धार्मिक उत्सवात डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची अनेक उदहारणं आहेत. पण आता या डीजेमुळं अनेक तरुणांच्या सरकारी नोकऱ्या तसंच परदेशात जाण्याची संधीही गमवावी लागली आहे. याचा स्पेशल रिपोर्ट साम टीव्ही न्यूजनं दिला आहे.
कायदेशीररित्या डीजेच्या आवाजावर ठराविक डेसिबलची मर्यादा घालण्यात आली आहे. पण ही मर्यादा कधीच पाळली जात नाही, त्यामुळं मोठ्ठ्याल्या आवाजात डीजे वाजवल्यानं आणि या डीजेच्या भिंतींजवळ नाचल्यानं बेकायदा कृत्य केल्याप्रकरणी तरुणांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळं यांपैकी अनेकांना सरकारी नोकऱ्या, परदेशातील शिक्षणाच्या संधी आणि खेळाच्या संधीही गमवाव्या लागल्या आहेत. पोलिसांच्या चारित्र्य पडताळी दरम्यान तरुणांवर ओढलेल्या या गुन्ह्यांमध्ये त्यांचं आयुष्य उद्धस्त झालं आहे.
क्षणभराच्या आनंदासाठी नियम तोडून डीजेवर थिरकल्यानं अनेक तरुणांवर गुन्हे दाखल आहेत. यामुळं MPSC परीक्षा पास होऊनही चारित्र्य पडताळणीमुळं त्यांनी हक्काच्या नोकऱ्या गमावल्या आहेत.
त्याचबरोबर हे गुन्हे पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी विविध कारणांसाठी पासपोर्ट व्हेरिफिकेशनवेळी रिजेक्ट झाल्यानं त्यांना शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी गमवावी लागली आहे.
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी परदेश जावं लागणार असताना पासपोर्टला क्लिअरन्स मिळत नसल्यानं त्यांची ही खेळण्याची संधीही गमावली गेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.