Kolhapur : देशभरात विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तांविरोधात केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली असताना आता कोल्हापुरातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गुरुवारी याचिका दाखल करण्यात आली असून एसआयआर प्रक्रिया थांबवण्याची मागणी या याचिकेतून केली आहे. शिवाय या प्रक्रियेतून रद्द केलेली नावे पुन्हा मतदान प्रक्रियेत प्रविष्ट करावी अशी ही मागणी केली आहे.
14 निर्णयांवर दोन निवडणूक आयुक्तांचे आक्षेप असूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याने कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही. असा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजकीय अभ्यासक प्रथमेश गोपाल गवाणकर त्यांचे सहकारी गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली नीलेश नार्वेकर (सर्व रा. रत्नागिरी) यांनी असीम सरोदे यांच्या मदतीने ही याचिका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी तसेच राज्य निवडणूक आयोगाला याचिकेत प्रतिवादी केले आहे.
दरम्यान ज्ञानेश कुमार यांनी घेतलेल्या 14 घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे अनेक गोष्टींवर आक्षेप या याचिकेतून घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक स्थगित करण्याची मागणी देखील या याचिकेमधून करण्यात आली आहे. घेतलेले कथित 14 निर्णय रद्द करणे, त्यामध्ये बदल करणे, राज्यातील एसआयआर पद्धत बंद करणे, त्यानुसार रद्द करण्यात आलेली मतदारांची नावे पुन्हा यादीमध्ये प्रविष्ट करणे, पुन्हा मतदार याद्या सुरळीत होत नाहीत तोपर्यंत निवडणुका स्थगित ठेवणे अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.