Sanjay Pandey
Sanjay Pandey sarkarnama
महाराष्ट्र

DGPसंजय पांडेंना पदावरुन काढणार? उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना त्यांच्या पदावरुन पायउतार व्हावं लागणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु झाल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) संजय पांडे हे पोलीस महासंचालक पदासाठी पात्र नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालक बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना हटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे सध्या तात्पुरता चार्ज आहे. संजय पांडे हे सध्या राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. त्यांच्याकडे तात्पुरता चार्ज असून त्यांच पद कायम करण्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे

संजय पांडे यांना पदावरून तात्काळ हटवून शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाची पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अ‍ॅड. दत्ता माने यांनी ही जनहित याचिका केली आहे. आता जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.

यूपीएसीने Union of Pan Asian Communities (UPAC) तीन पात्र अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी सुचवली आहेत. अद्यापही कायमस्वरुपी पोलीस महासंचालक नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हेमंत नगराळे, के. वेंकटेशम आणि रजनीश सेठ यांच्या नावाची शिफारस केली आहे. राज्यातील 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव युपीएससी पॅनेलला सुचवावी लागतात. युपीएससीचं पॅनल त्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करीत असतात. ''पांडे यांना तात्काळ हटवून शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाची पूर्णवेळ नियुक्ती करावी,'' असे याचिकेत म्हटलं आहे.

पोलीस महासंचालकपदी नियुक्त झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून क्लियरन्स लागतं. याबाबत राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या पत्रव्यव्हाराला यूपीएससीने प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी संजय पांडे पोलीस महासंचालक पदासठी पात्र नसल्याचं आयोगाचं म्हणणं होतं. पण राज्य सरकारने पांडे यांनाच कायम ठेवलं आहे. याचबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "युपीएससी आयोगाने पांडेंना हटवण्यास सांगितलं होतं. पण आम्ही त्यांना हटवणार नाही. आम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाला आमचं उत्तर कळवलं आहे", अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काही दिवसापूर्वी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT