Rashmi Shukla Order : महाराष्ट्र पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी केलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येते. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी 2024 च्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. राज्यातील 800 जणांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून त्यात बीड जिल्हा पोलिस दलातील केवळ एकाच कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवारी याबाबतचा आदेश काढला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलिस दलामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तर कामगिरीबद्दल आणि राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक व शौर्य पदक प्राप्त पोलिस अधिकारी व अंमलबदार यांना सन्मानचिन्ह प्रदान करीत आहे. शुक्ला यांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे.
पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यादीत पहिले नाव मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागाचे सह आयुक्त शारदा राऊत यांचे आहे. त्याचप्रमाणे पोलिस उपमहानिरीक्षक अनिल पारसकर, एम. रामकुमार, पोलिस अधीक्षक जयंत मीना, श्रवण दत्त एस., राज तिलक रोशन, ऋषिकेश रावले, एम. रमेश या आय़पीएस अधिकाऱ्यांचा यादीत समावेश आहे.
यादीमध्ये 14 पोलिस अधिक्षकांससह तीन अपर पोलिस अधिक्षक आणि 10 उपअधिक्षकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 58 पोलिस निरीक्षक, 22 सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, नाईक आणि पोलिस शिपायांचाही या यादीत समावेश आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांच्या पोलिस दलातील हे अधिकारी व कर्मचारी आहेत.
पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त 800 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यादीत बीड जिल्ह्यातील केवळ एकच नाव आहे. बीड पोलिस दलातील हवालदार दिपक उदयसिंग रहेकवाल हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. मागील काही महिन्यांत बीड पोलिस दलातील काही अधिकारी व कर्मचारी सरकारच्या निशाण्यावर आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर काही पोलिसांना निलंबितही करण्यात आले असून बदल्याही झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.