Eknath Shinde  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Updates : एकनाथ शिंदेंचा शिलेदार अडचणीत, आयकर खात्याची नोटीस आली..

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...

Ganesh Sonawane

Sanjay Shirsath : शिंदे गटाचा नेता अडचणीत, आयकर खात्याची नोटीस आली

महायुतीतील शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कारवाई शिंदे गटासाठी आणि खास करून शिरसाट यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या मोठा झटका मानला जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील व्हिटस् हॉटेलप्रकरणात संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे समजते. संजय शिरसाट यांनी एका जाहीर कार्यक्रमात ही कबुली दिली. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिरसाट यांच्याकडे आयकर खात्याने मोर्चा वळवला आहे.

Nishikant Dubey : माहिममध्ये मुस्लिम आहेत..निशिकांत दुबेचं ठाकरे बंधूंना पुन्हा चॅलेंज 

निशिकांत दुबे म्हणाले यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना चॅलेंज दिलं आहे. तुम्ही गरीबांना मारहाण करता. इथे मुकेश अंबानी राहतात, ते कमी मराठी बोलतात हिम्मत असेल तर तिथे जा. माहिममध्ये मुस्लिम आहेत, हिम्मत असेल तर तिथे जा. स्टटे बँक ऑफ इंडियाचा चेअरमन आंध्र प्रदेशचा आहे तो तेलगु बोलतो, एलआयसीचा चेअरमन नॉर्थ ईस्टचा आहे. त्यांना मारहाण करुन दाखवा असं आव्हान निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधुंना केलं आहे.

Devendra Fadnavis : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता ‘सिंदूर उड्डाणपूल’, फडणवीसांची माहिती 

दक्षिण मुंबईतील नूतनीकरण केलेल्या कर्नाक उड्डाणपुलाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या पुलाचे नाव आता ‘सिंदूर उड्डाणपूल’ असे ठेवण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या नावात बदल केला असून, हे नाव भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या पाकिस्तानविरुद्धच्या लष्करी कारवाईपासून प्रेरित आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Dhule news : माजी सैनिक चंदू चव्हाणला पालिका कर्मचाऱ्यांकडून मारहाण

पाकिस्तानच्या कैदेत राहिलेले आणि सर्जिकल स्ट्राइकवेळी चर्चेत आलेले माजी सैनिक चंदू चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप करत त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चंदू चव्हाण हे काही दिवसांपासून त्यांच्या परिसरातील गटार साफसफाईबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करत होते. त्याच संदर्भात ते आज महानगरपालिकेत निवेदन देण्यासाठी गेले असताना, तिथेच वाद विकोपाला गेला आणि काही कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT