Congress Meeting For Lok Sabha Election : आगामी लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने राज्यातील एकवीस लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला पक्षाला सकारात्मक वातावरण असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचा निरीक्षण आहे. महाराष्ट्र काँग्रेसने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, त्यानंतर आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला असल्याची माहिती मिळत आहे.
विदर्भात विभागात १० लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगली आणि पोषक वातावरण आहे. सकारात्मक परिस्थिती आहे. गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या मतदारसंघात परिस्थिती काँग्रससाठी चांगली आहे. तर अमरावती जागा काँग्रेसने लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.चंद्रपूरमध्ये याआधीही काँग्रेसचे खासदार होते, तिथेही काँग्रेससाठी वातावरण चांगले
मराठवाडा विभागात नांदेड, हिंगोली, लातूर हे नेहमीच काँग्रेसचे गड राहिले आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला या ठिकाणी धक्के बसले होते. मात्र यावेळी तिथे परिस्थितीत सुधारणा होत आहे, असे महाराष्ट्र काँग्रसने घेतलेल्या आढाव्यात दिसून ल्याचे सांगितले आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात काँग्रेसने लढत द्यावी, त्यामुळे शिर्डीची जागा पक्षाकडून लढवली जावी, ही भूमिका स्थानिक काँग्रेसने मांडली आहे. त्याप्रमाणेच धुळे, नंदुरबार याही जागांसांठी काँग्रेस आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगले या जागा काँग्रेसने लढवावे, अशी मागणीही काँग्रेसच्या या बैठकीत करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसकडून फक्त पुणे आणि सोलापूर या जागा लढवल्या जातात. तर मुंबईत काँग्रेससाठी दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम मुंबई हे दोन मतदारसंघ पूरक ठरू शकतात, असे निरिक्षणात दिसून आले आहे.
महाविकस आघाडी मध्ये आगामी लोकसभेच्या अनुषंगाने जागावाटपाचा फॉर्म्युला अजून काही ठरला नाही. जागावाटपावर निश्चित निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही.पण काँग्रेसच्या प्राथमिक चाचपणी मध्ये २१ जागांवर काँग्रेससाठी परिस्थिती सकारात्मक असल्याचा काँग्रेसचा दावा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.