मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाl एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पंच प्रभाकर साईल यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आणखी एका पंचाने वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. नवी मुंबईतील शेखर कांबळे (Shekhar Kamble) नावाच्या व्यक्तीने वानखेडेंवर आरोप केले आहेत.
नायजेरियन प्रकरणात शेखर कांबळे व त्याच्या एका मित्राला पंच साक्षीदार बनवण्यात आलं होतं. दहा कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. याबद्दल विचारणा केली असता 'आम्ही त्यावर नंतर लिहू' असं त्यांना सांगण्यात आलं होतं. . एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दहा कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतची बातमी दिली आहे.
शेखर कांबळे म्हणाले की, या प्रकरणात ज्या दोघांना पकडण्यात आलं होतं, त्यांच्याकडं कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. असं असतानाही त्यांच्याकडं ६० ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचं नमूद करण्यात आलं, दहा कोऱ्या कागदावर आमच्या सह्या घेण्यात आल्या. याबद्दल विचारणा केली असता 'आम्ही त्यावर नंतर लिहू' असं त्यांना सांगण्यात आलं होतं.
'खारघरमधील 80/2021 या केसमध्ये एका नायजेरियनला पकडण्यात आलं होतं. त्याचेकडे ड्रग्स सापडलेच नव्हते. ज्या व्यक्तीकडे ड्रग्स सापडले होते तो पळून गेला होता. पण एनसीबीने कारवाई करताना भलत्याच व्यक्तीला पकडून आरोपी म्हणून दाखवलं होतं. याच प्रकरणात साक्षीदार म्हणून माझ्या देखील कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या होत्या.' असा गंभीर आरोप शेखर कांबळे याने केला आहे.
'मी फसलो गेलो आहे. एक खारघरच्या इमारतीवर धाड मारली तेव्हा तिथून सगळे नायजेरियन बाहेर पडले. त्यावेळी दोन नायजेरियन एनसीबीच्या हाती लागले. त्यात एक छोटा मुलगा होता आणि एक मोठा नायजेरियन व्यक्ती होता. या दोघांना ऑफिसमध्ये नेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी छोट्या मुलाला सोडून देण्यात आलं. पण ज्या नायजेरियनला पकडलं गेलं त्याच्याकडे ड्रग्स सापडलं नव्हतं. तरीही त्याच्याकडे 60 ग्रॅम ड्रग्स सापडलं असं यांनी दाखवलं आहे.' असे कांबळे यांनी म्हटलं आहे.
आज समीर वानखेडे याचे मुस्लिम पध्दतीने जे लग्न झाले त्याचा फोटो आणि लग्नपत्रिका ट्वीटरवर शेअर करुन नवाब मलिक यांनी आणखी एका बोगस प्रकरणाचा पर्दाफाश केला. ''एनसीबीच्या अधिकार्याने एक पत्र माझ्याकडे पाठवले होते ते पत्र डीजी आणि एनसीबीकडे माझ्या लेटरहेडवरुन पाठवले आहे. सीबीसीच्या मार्गदर्शक सुचनेवरुन निनावी पत्राची चौकशी होत नाही, परंतु ज्यापध्दतीने त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे, त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होवू शकतो,'' असेही नवाब मलिक म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.