Manoj Jarange and Prakash Ambedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar Politics : मनोज जरांगे प्रस्थापित मराठ्यांसोबत, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले, ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध!

Prakash Ambedkar Criticized Manoj Jarange : प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील हे प्रस्थापित मराठ्यांसोबत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Prakash Ambedkar News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, आम्ही राज्यातील ओबीसींच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे प्रस्थापित मराठ्यांसोबत आहेत गरीब मराठ्यांसोबत नाहीत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

लातूर येथे आयोजित केलेल्या वंचितच्या दोन दिवशीय अभ्यास शिबिरात आंबेडकर बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले आणि शासनाने हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी तपासयाला सुरुवात केली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणे चुकीचे आहे. हे या समाजावर अन्याय करणार आहे, असे आंबेडकर म्हणाले.

जरांगे यांच्याकडे अजेंडा नाही, ते प्रस्थापित मराठ्यांसाठी काम करत आहेत. गरीबांसाठी नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायला कोणाचाच विरोध नाही. पण तसे न करता ओबीसीतून देण्याचा घाट घातला जात आहे. राज्यातील ओबीसींच्या मागे वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहणार आहे, असे देखील प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

भाजप ओबीसींचा शत्रू

प्रकाश आंबेडकर यांनी हैदराबाद गॅझेटीअर लागू केल्यानंतर सांगितले होते की, भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत, आणि आरक्षण असूच नये असा गोंधळ घालायला त्यांनी सुरुवात केली आहे. भाजपकडून सांगितले जाते की, आमचा डीएनए हा ओबीसी आहे पण, ओबीसींनी हे समजून घेतलं पाहिजे की, ओबीसींचा सर्वात मोठा शत्रू भाजपच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT