Prakash Ambedkar & Ramdas Athwale News Sarkarnama
महाराष्ट्र

Ambedkar & Athwale News : आंबेडकर - आठवलेंचं झालं एकमत; म्हणाले, '' उध्दव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून...''

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा सल्ला ऐकतात की शरद पवारांचा ते लवकरच कळेल.

सरकारनामा ब्यूरो

Pune : वंचित बहुजन आघाडीची भांडुपमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते व अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. तसेच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा राजकीय बळी जाईल असंही यावेळी म्हणाले आहेत. आंबेडकरांच्या विधानावर तीव्र पडसाद उमटत आहेत. पण कधी नव्हे ते पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवलेंमध्ये एकमत झाल्याचं समोर येत आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी उध्दव ठाकरेंना दिलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडावं हा सल्ला दिला आहे. आठवले म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, हा प्रकाश आंबेडकरांचा चांगला सल्ला आहे. ठाकरेंनी हा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मान्य करायला हरकत नाही असंही आठवल म्हणाले.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याबरोबर युती केली होती. ती आता आहे की नाही ते माहिती नाही. पण ठाकरे गट वंचितच्या युतीला भीमशक्ती शिवशक्ती युती म्हणता येणार नाही. मात्र, त्यांनी दिलेला सल्ला उद्धव ठाकरे यांनी मान्य करायला हरकत नाही. आता उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा सल्ला ऐकतात की शरद पवारांचा ते लवकरच कळेल. मात्र, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला योग्य आहे, या सल्ल्याला माझाही पाठिंबा आहे असंही आठवले यावेळी म्हणाले.

मोदींविरोधात कितीही पर्याय उभे केले. तरीदेखील आम्ही २०२४ ची निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत. कर्नाटकमध्ये काँग्रेसला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तो निकाल आम्हांला मान्य आहे. मात्र, मोदींविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात विरोधक एकत्र येत आहे. ही गोष्ट नक्कीच जनतेला खटकणारी आहे. २०२४ ला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला हरवणं सोपं नाही. त्यामुळे २०२४ ला देशात एनडीएचीच सत्ता येणार असून मोदीच पंतप्रधान होणार आहे.

नाना पटोलेंचा टोला...

काँग्रेसच्या नाना पटोलेंची वक्तव्य म्हणजे इंग्रजी चित्रपट ‘हॉट अँड ब्लो’प्रमाणे कधी गरम तर कधी नरम हवा निर्माण करणारी आहेत. नागपुरात ते म्हणाले, स्वतंत्र लढायचे. मविआच्या बैठकीत म्हणतात एकत्र लढायचे. त्यामुळे त्यांच्या विधानांवर ठाकरेंनी लक्ष ठेवावं असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.

त्यावर पटोले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तेथील नेत्यांशी चर्चा करून स्वतंत्र लढणार अशी भूमिका आम्ही घेतली आहे. याचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल आम्ही भूमिका मांडली नाही. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा करणं योग्य नाही.”

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT