Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Nana Patole, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

VBA in MVA : 'वंचित'ला 'मविआ'मध्ये एन्ट्री?

Sharad Pawar Appeal to Mahavikas Aaghadi : 'मविआ'च्या बैठकीत डावे पक्ष, वंचितशी चर्चा करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News :

महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी आणि डाव्या पक्षांना सामावून घ्या, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आज दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या वतीने जितेंद्र आव्हाड सहभागी होत आहेत.

यावेळी महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा करताना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला, तसेच डाव्या पक्षांना सामावून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा, अशी सूचना शरद पवारांनी केली आहे. पवारांच्या या सूचनेमुळे आता वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेश निश्चित मानला जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला राज्यात महाविकास आघाडी तसेच देशातील इंडिया आघाडीत सामावून घ्यावे, अशी चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. पण वंचितसाठी अजून भाजपविरोधी महाविकास आघाडीचे दरवाजे उघडलेले नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती आहे. शिवाय आंबेडकरांना आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी उद्धव ठाकरे तसेच शरद पवार प्रयत्नशील आहेत. तरीही आंबेडकरांना अजून इंडिया आघाडीत सामावून घेतलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीलाही प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण नाही. याबाबत त्यांनी काल (8 जानेवारी) नाराजी व्यक्त केली होती. ही बैठक आहे, हे मला वर्तमानपत्रातून कळले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. शिवाय महाविकास आघाडीचे अजून राज्यातील जागावाटप का झाले नाही, असा सवालही त्यांनी केला होता.

या पार्श्वभूमीवर 'वंचित'ला चर्चेत आणि जागावाटपात सामावून घ्या, ही शरद पवारांची सूचना खूप महत्त्वाची आहे. कदाचित 'वंचित' लवकरच आघाडीमध्ये सामावून घेतले जाईल, याचे संकेत असावेत, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

भाजपच्या विरोधात एकीने लढण्यासाठी राज्यात 'महाविकास आघाडी' तयार झाली तर देशात 'इंडिया' आघाडीची मोट बांधण्यात आली आहे. यात देशातील भाजपविरोधी 28 पक्षांचा सहभाग आहे. भाजपप्रणीत एनडीएविरोधात काँग्रेसप्रणीत 'इंडिया' आघाडी असे चित्र सध्या देशात आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीला 'इंडिया' आघाडीचे गेट केव्हा उघडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT