Prashant Kishor meet Sunetra Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मोठी बातमी! प्रशांत किशोरांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; निवडणुकीची रणनीती ठरणार?

Prashant Kishor meet Sunetra Pawar : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे मुंबईत दाखल झाले असून त्यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे.

Roshan More

NCP News : बिहारमध्ये भाजपच्या बालेकिल्ला बांकीपूरमध्ये विजय मिळवलेले प्रशांत किशोर हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगाल्यावर ते दाखल झाले आहेत. सुनेत्रा पवारांसोबत त्यांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्याच सल्लानुसार जूनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपला वर्धापन दिन साजरा केला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने रणनीती ठरवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रशांत किशोर यांचा सल्ला घेतला असल्याची चर्चा आहे.

मे महिन्यात देखील प्रशांत किशोर हे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना भेटले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या रणनीतीचे काम प्रशांत किशोर यांची कंपनी करणार असल्याची चर्चा होती. मात्र, पार्थ पवार यांनी या चर्चा फेटाळत प्रशांत किशोर हे कौटुंबीक स्नेही असल्याने त्यांना जेवणासाठी आमंत्रित केल्याचे सांगितले होते.

पार्थ पवार यांनी तेव्हा ट्विट करत सांगितले होते की, प्रशांत किशोर यांनी राजकीय सल्लागार म्हणून काम करणे सोडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ते निवडणूक रणनीती आखणार आहेत या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. दरम्यान, राजकीय कामात नसलो तरी आम्ही एकमेकांना कायम उपलब्ध आहोत आणि राहू, असे देखील पार्थ पवार म्हणाले होते.

दुसरी भेट अन्...

मे महिन्यानंतर प्रशांत किशोर हे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षांचा कालावधी असला तरी अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसाठी प्रत्येक निवडणूक ही कसोटीची ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सल्लागर म्हणून प्रशांत किशोर यांची मदत घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT