Prashant Koratkar And Historian Indrajit Sawant sarkarnama
महाराष्ट्र

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरची पोलिसांच्या हातावर तुरी? कोलकत्ता मार्गे दुबईला पलायन?

Prashant Koratkar On Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रशांत कोरटकरने केलं होतं. तसेच त्याने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Aslam Shanedivan

Nagpur News : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याची घटना समोर आली होती. नागपुरच्या प्रशांत कोरटकर याने हे वक्तव्य आणि धमकी दिली होती. याप्रकरणी कोल्हापूर येथे गुन्हा नोंद झाला असून त्याच्या जामिनाची याचिका देखील न्यायालयाने फेटाळली आहे. यानंतर त्याला कधीही अटक होण्याची शक्यता असून तो अद्याप फरार आहे. तर पोलिस त्याचा शोध नागपूरसह मध्यप्रदेशमध्ये घेत आहेत. यादरम्यान फरार असणारा प्रशांत कोरटकर महाराष्ट्रासह मध्यप्रदेश काय तर तो देशातच नसल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरटकर पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला असून तो दुबईला पळाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर फरार आहे. तो पोलिसांना पोलिसांना गुंगारा फिरत आहे. यामुळे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पण अद्याप तो पोलिसांना मिळालेला नाही. कोरटकरचा शोध सुरू असताना, नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरटकरने पोलिसांना गुंगारा देते, त्यांच्या हातावर तूरी दिली आहे. तो दुबईला पळून गेल्याचे आता उघड झाले आहे. याबाबत सध्या त्याचा एक एक फोटोही समोर आला असून तो दुबई असल्याचे बोलले जात आहे. प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी आपल्या वकिलांद्वारे मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती.

पण न्यायालयाने कोरटकर याला दिलासा न देता त्याची पूर्व जामीनाचा अर्ज फोटाळला होता. न्यायालयाच्या याच निर्णयानंतर तो मध्यप्रदेशमध्ये पळाल्याची माहिती समोर आली होती. त्याप्रमाणे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. यादरम्यान आता कोरटकरने देश सोडल्याचे समोर आले आहे. कोरटकर कोलकत्ता मार्गे दुबईला पळून गेला आहे. सध्या त्याच तेथील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे आता पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

काही दिवसांपूर्वी कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली होती. याचवेळी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे राज्यात संताप उसळला होता. या विषयावर सभागृहात देखील चर्चा झाली होती. कोरटकरवर या प्रकरणी कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला असून कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मागावर आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. तर मध्यप्रदेशातही तपास सुरू आहे. पण कोरटकरचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT