Bjp Leader Pravin Darekar Sarkarnama
महाराष्ट्र

Praveen Darekar News : 'जागा वाटप, नेतृत्वावरून महाविकास आघाडीत..' ; प्रवीण दरेकरांचे विधान!

Praveen Darekar on Manoj Jarange and Bacchu Kadu : मनोज जरांगे, बच्चू कडू यांच्यावरही साधला आहे निशाणा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Praveen Darekar on Mahavikas Aghadi : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी नांदेडमध्ये बोलताना मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. तर बच्चू कडू यांना टोला लगावत, महाविकास आघाडीवर निशाणा साधला. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत विसंवाद निर्माण झाला असून, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, त्या प्रकारचे चित्र निर्माण झालेला आहे.असंही दरेकरांनी बोलून दाखवलं आहे.

प्रवीण दरेकर(Praveen Darekar) म्हणाले, 'मराठा आरक्षण हा विषय आता बाजूला राहिलेला आहे. ते पूर्णपणे राजकीय झालेले आहेत, राजकीय नेत्याला लाजवेल अशी भाषा त्यांचा तोंडी येत आहे, याचाच अर्थ आता ते पूर्णपणे राजकीय झालेले आहेत. मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या दृष्टीने प्राधान्य राहिलेले नाही, त्यांना जी राजकीय पोळी भाजायची होती, ती त्यांनी मराठा समाजाचा वापर करून घेतली आहे.' अशा शब्दांत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.

बच्चू कडू(Bacchu Kadu) यांच्यावर बोलताना दरेकर म्हणाले, 'तालीम आता सुरू झालेली आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे जो तो आपल्या पक्षाचा उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी राजकीय विधानं करत असतो. मला वाटतं बच्चू भाऊंनी दमानं घेतलं पाहिजे. जुळवा जुळव सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा गणपती करायला पहिलं बच्चू कडू यांनी गणपती तयार करण्याची माती मजबूत केली पाहिजे. मी बोलघेवडा म्हणून राहाल आणि मुख्यमंत्री तुमचा कधी काय करतील याचा पत्ता लागणार नाही.'

तसेच 'मी काय अंतर्यामी नाहीये, आता राजकारण सुरू आहे तीन-तीन पक्षाची महायुती आणि महाविकास आघाडी आहे. त्यामुळे लोक इकडून तिकडं तिकडून इकडे जाणारी असतात. आमची महायुती अतिशय भक्कम आहे असे किती भूकंप आले. या ठिकाणी वीटही हलणार नाही. तेवढा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे.' अशा शब्दांत दरेकर यांनी आदित्य ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे.

अनेक नेते आमच्याकडे येऊ शकतात -

'महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, त्या प्रकारचे चित्र निर्माण झालेला आहे. महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi)मध्ये कुठल्याही प्रकारचा सुसंवाद राहिलेला नाही. जागा वाटप, नेतृत्व, यावरून त्यांची तिथं मारामारी सुरू आहे. मागची पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व दिले आणि आताचे अडीच वर्षे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व दिलं. राज्य प्रगतीकडे वाटचाल करत आहे. गोरगरिबांच्या कल्याणच्या योजना येत आहेत. शेवटी राजकारण आम्ही विकासासाठी, प्रगतीसाठी करत असतो. अनेक नेते आमच्याकडे येऊ शकतात.' असा दावाही प्रवीण दरेकर यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT