Prithviraj chavan uddhav Thackeray Sharad Pawar .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Crisis: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ...'; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

Maharashtra Political News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनौपचारिक भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बहुचर्चित ऑपरेशन लोटस राबवलं. उद्धव ठाकरेंना धक्का देत त्यांच्या पक्षातील सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत. त्यांनी माध्यमांना साधलेल्या संवादात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केला आहे. मात्र,त्यांनी यावेळी हे सर्व खासदार पक्ष सोडतील का नाही ते सांगता येणार नसल्याचंही म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, चिंताजनक खबर निश्चित आहे की, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहित नाही. त्याकरिता त्यांच्या पाठीमागं मोदी-शाह सरकार हात धूवून लागलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा अशीच त्यांची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत जे केलं तेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत होऊ शकतं,असा राजकीय बॉम्बही चव्हाण यांनी टाकला आहे. हे सर्व खासदार सोडून जाणार की नाही याबाबत अधिकचं भाष्य त्यांनी टाळलं. मात्र,हे खासदार अस्थिर असल्याचं धक्कादायक विधान चव्हाण यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनौपचारिक भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर शरद पवारांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या आणि विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुमारे 30 वर्षांनंतर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच बुधवारी(ता.8) विधानसभेत सीमाप्रश्नासंदर्भातील बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक त्यांनी घेतली. विशेष म्हणजे, शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांनी ही बैठक घेतली. त्यावेळी, शिंदेंनीही बैठकीला जाण्याआधी शरद पवारांची भेट घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT