Rahul Gandhi, Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Gandhi News : मोदीजी,यासाठीही महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागा; राहुल गांधींचा जोरदार टोला

Political News : सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या कै. पंतगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदींच्या माफीनाम्यावर राहुल गांधी यांनी टोला लगावला.

Sachin Waghmare

Sangali News : ज्यांनी चूक केली नाही तर माफी मागायची वेळ येत नाही. चूकच केली नाही त्यांनी माफी कशाची मागायची. राज्यात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली. पंतप्रधानांनी माफी मागितली त्याची वेगवेगळी कारणे असतील. या मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिले. मूर्ती बनवत असताना जो भ्रष्टचार झाला आहे, त्यामुळे ते माफी मागत असावेत. त्यांना जर माफी मागायची असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागावी, असा टोला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या कै. पंतगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले, पंतगराव कदम हे आयुष्यभर काँग्रेससोबत होते. जेव्हाही मी महाराष्ट्रात येतो त्यावेळेस आनंद होतो. येथील संस्कृती व महाराष्ट्रात काँग्रेसची खोल विचारधारा आहे. महाराष्ट्र हा काँग्रेसच्या (Congress) विचाराचा गड आहे. महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवण्याचे काम करीत असल्याचा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.

मी जेव्हा महाराष्ट्रात येतो, तेव्हा मला असे वाटत हा प्रदेश आमच्या विचारधारेचा गड आहे. तुमच्या डीएनएमध्ये ही विचारधारा आहे. तुम्ही देशात आज भारतात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकाबाजूला काँग्रेस पार्टीची विचारधारा दुसऱ्याबाजूला भाजप आहे. आम्हाला सामाजिक विकास हवा आहे.

आम्हाला सर्वांना जोडून पुढे न्यायचे आहे. त्यांना निवडणुकीत निवडक लोकांना फायदा पोहोचवायचा आहे. मागासांनी मागास, दलित दलित रहावेत, अशी त्यांची इच्छा आहे. जातीचा रचना जशी आहे, तशीच रहावी अशी त्यांची इच्छा आहे. ही आमच्या दोघांमध्ये लढाई असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. एका धर्माला दुसऱ्या धर्माशी, एकाजातीला दुसऱ्या जातीशी लढायला लावतात. मणिपूर बघा, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा नागरी युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. दीडवर्ष झालं भारताचे पंतप्रधान तिथे गेले नाहीत, कारण तिथे भाजपाच्या लोकांनाी आग लावली आहे. पीएम मोदी गेल्या वर्षभरात मणिपूरला गेले नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT