Rahul Narvekar Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Narvekar: नार्वेकरांचा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप? अहवालावर निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे काय म्हणाले?

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या आम आदमी पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.पण राज्य निवडणूक आयोगाने नार्वेकर यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांना ‘क्लीनचिट’ दिली आहे.

याबाबत निवडणूक आयोगाकडे काही व्हिडिओ देण्यात आले आहे. याबाबत राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'सकाळ'चे विनोद राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राहुल नार्वेकर यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचे आरोप झाले आहेत, यावर वाघमारे म्हणाले, "विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासंदर्भात आमच्याकडे आलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी कुणावर दबाव टाकल्याचे दिसत नाही. हे व्हिडीओ आता मुख्य निवडणूक निरीक्षक इक्बालसिंह चहल यांच्याकडे पाठवले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर उचित कार्यवाही करण्यात येईल,"

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या आम आदमी पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले, याप्रकरणी तक्रारीनंतर ‘ए’ वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेने पाठविलेल्या अहवालात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कृती नियमाला धरून जरी असली तरी प्रशासकीय कार्याला अनुकूल नव्हती, असे मत नोंदवले आहे. याबाबत दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कुलाबा येथील निवडणूक अधिकाऱ्यांवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रतिबंध केल्याची तक्रार आमच्याकडे आली; मात्र त्या अधिकाऱ्याने नियमानुसार कारवाई केल्याचा अहवाल मुंबई महापालिका आयक्तांनी दिला आहे. प्रथमदर्शनी संबंधित अधिकाऱ्यांनी बेकायदा कृती केली नसल्याचे निदर्शनास आले आहे, असे वाघमारे म्हणाले.

नार्वेकर यांनी दबाव आणला?

कुलाबा येथील प्रभाग २२५, २२६, २२७ हे पालिकेच्या ‘ए’ प्रभागांतर्गत येतात. या ठिकाणी राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. अर्ज दाखल करण्याच्या वेळी नार्वेकर तेथे उपस्थित होते. त्यांनी दबाव आणल्याचा आरोप आप व अन्य उमेदवारांनी केला आहे. येथून जनता दल आणि आम आदमी पक्षाचे उमेदवारही निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT