रायगड येथील समुद्रात बोट बुडालीची घटना समोर आली आहे. यात किती जण बुडाले, कशामुळे हा अपघात झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक कोळी समाजातील नागरिकांनी बचाव कार्य सुरु केले आहे. करंजा गावाजवळ ही घटना घडली आहे. लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ही बोट गुजरात येथील असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारात ही घटना घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. बोट बुडत असल्याने बोटीवरील खलासांनी समुद्रात उड्या मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने, राज्य सरकारने यांची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
समुद्राचे पाणी शिरल्यामुळे ही बोट समुद्रात बुडाल्याचे म्हटले जात आहे. या बोटीमध्ये काही मच्छीमार,खलासी होते. या मच्छीमारांना शोधण्याचा आणि त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. ही दुर्घटना झाल्यानंतर बोट थेट बुडाली आहे. या बोटीचा आता शोध घेतला जात आहे. ही बोट अजूनही मिळालेली नाही.