Raj Thackeray The Friendship Files Documentary : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे. ‘डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या!’ अशा आशयाच्या आवाहनामुळे राज ठाकरे यांनी शेअर केलेली डॉक्युमेंट्री नेमकी कोणती, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘द फ्रेंडशिप फाइल्स’ (The Friendship Files) असं या डॉक्युमेंट्रीचं नाव असून, त्यात नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदाणी यांच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
राज ठाकरे यांनी ही डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर करत सरकारला ती समाजमाध्यमांवरून हटवायची असल्याचा दावा केला आहे. “सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या!” असं राज ठाकरेंनी म्हणलं आहे. या पोस्टमुळे ‘द फ्रेंडशिप फाइल्स’ या डॉक्युमेंट्रीकडे सोशल मीडिया वापरकर्त्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. ही डॉक्युमेंट्री सुमारे 36 मिनिटांची असल्याचं सांगितलं जात आहे.
या डॉक्युमेंट्रीमध्ये नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्यातील संबंधांचा प्रवास मांडण्यात आल्याचा दावा आहे. 2003 पासून दोघांमधील जवळीक वाढल्याचा संदर्भ त्यात दिला जातो. गुजरातमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अदाणी यांनी मोदींना कशी साथ दिली, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
याशिवाय, अदाणी समूहाला गुजरातमध्ये सुमारे 15,000 एकर जमीन अत्यंत कमी दराने देण्यात आल्याचा मुद्दा या डॉक्युमेंट्रीत मांडण्यात आला आहे. जमिनीच्या दरांची तुलना टाटा नॅनो प्रकल्प आणि फोर्ड कंपनीच्या प्रकल्पासाठी दिलेल्या दरांशी करण्यात आलं आहे. 2014 मधील विमानप्रवासाचाही उल्लेख यात आहे.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी गुजरातहून दिल्लीला ज्या विमानाने गेले, ते विमान गौतम अदाणी यांचं होतं, असा दावाही या डॉक्युमेंट्रीत करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
राज ठाकरे यांच्या पोस्टमुळे ‘द फ्रेंडशिप फाइल्स’ ही डॉक्युमेंट्री चर्चेत आली असून, तिच्यातील दावे आणि त्यामागील पुराव्यांबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.