Raj-Uddhav Thackeray Unity News : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिने राज-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीने या युती होणार की नाही? याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधुंनी एकत्र आले पाहिजे, यासाठी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे मराठी बांधवांच्या वतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संयुक्त बॅनर फडकवण्यात आले.
व्हिएतनामधील मराठी संघटनांनी महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी भावना व्यक्त केली. त्यांनी लावेल्या बॅनरमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता तसेच महाराष्ट्राच एकच ब्रँड असा उल्लेख होता.
मतभेद असू शकतात, पण मनभेद नसावेत; राजकारणात भिन्नता असली तरी महाराष्ट्रासाठी एकवाक्यता हवी, असा विश्वास या उपक्रमामागे असलेल्या स्थानिक मराठी संघटनांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मनसे युतीसाठी पहिला प्रस्ताव देणार नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यावर आम्ही विचार करू, असे मनसेचे नेते सांगत आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनंतर स्थानिक पातळीवरील मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उत्साहीत झाले होते. डोंबिवलीमध्ये तर मनसेच्या नेत्यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेला भेट दिली. नाशिकमध्ये देखील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते युतीच्या चर्चेमुळे उत्साहीत होते. मात्र, राज ठाकरे-मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीने आता मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.
दिवाळीनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युती आघाडीच्या चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरेंनी बैठकांचा सपाटा लावला आहे. शाखा प्रमुखापासून उपनेते नेते यांच्या बैठका ते घेत असून मुंबई महापालिकेसाठी तयार राहण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील युती आणि आघाडीचा निर्णयाची वाट पाहत बसू नका कामाला लागा, असा संदेश मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.